HomeBlogदारू, गुटखा, वाळू तस्करीवर धडक कारवाई; सपोनि विजय जाधव यांच्या कारवाईची परिसरात...

दारू, गुटखा, वाळू तस्करीवर धडक कारवाई; सपोनि विजय जाधव यांच्या कारवाईची परिसरात चर्चा… नायगाव, गोविंद नरसीकर

बिलोलीत अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा दणका!

दारू, गुटखा, वाळू तस्करीवर धडक कारवाई; सपोनि विजय जाधव यांच्या कारवाईची परिसरात चर्चा

नायगाव प्रतिनिधी – गोविंद नरसीकर

बिलोली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून अवघे दोन महिने होत नाहीत तोच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी अवैध धंदेवाल्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. कारला व केसराळी येथे अवैध देशी दारू, सगरोळी येथे गुटखा विक्री, तर सगरोळी व मिनकी परिसरातील अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सलग होत असलेल्या या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

१६ जून २०२६ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर दुय्यम पोलीस अधिकारी सपोनि जाधव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाईचे सत्र सुरू केले. दारू, गुटखा आणि अवैध वाळू वाहतुकीसारख्या प्रकारांवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करत पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. त्यामुळे बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची हालचाल वाढल्याचे चित्र आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाईचा धडाका

अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करताना पोलिसांनी केवळ एका प्रकारावर लक्ष केंद्रित न करता विविध अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे. कारला व केसराळी येथील अवैध देशी दारूविक्री, सगरोळी येथील गुटखा विक्री तसेच सगरोळी आणि मिनकी परिसरातील वाळू वाहतुकीवर करण्यात आलेल्या कारवायांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू झाली आहे.

पूर्वीच्या सेवेतही उल्लेखनीय कामगिरी

सपोनि विजय जाधव यांना गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच आरोपींचा शोध घेण्याचा अनुभव आहे. रामतीर्थ पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत कार्यरत असताना देगलूर निवडणुकीतील कायदा-सुव्यवस्था राखणे, अवैध पिस्तूल व तलवारी जप्त करणे, दरोड्यातील आरोपींना पकडणे तसेच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तसेच नांदेड विमानतळ पोलीस ठाण्याच्या DB पथकात कार्यरत असताना चैन स्नॅचिंग, घरफोडी, जबरी चोरी तसेच उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यात त्यांनी योगदान दिले. MCOCA, MPDA आणि तडीपारीच्या प्रस्तावांवरही त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.

‘अवैध धंद्यांना थारा नाही’चा संदेश

बिलोली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत झालेल्या कारवायांमुळे सपोनि विजय जाधव यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. अवैध धंद्यांविरोधातील कारवाईचा हा धडाका आगामी काळातही कायम राहणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular