HomeBlogनायगाव जिल्हा निर्मिती साठी सर्व पक्षीय, संघटनाचे एकमत ; वेळ प्रसंगी तीव्र...

नायगाव जिल्हा निर्मिती साठी सर्व पक्षीय, संघटनाचे एकमत ; वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार …… नायगाव, अशोक वाघमारे

नायगाव जिल्हा निर्मिती साठी सर्व पक्षीय, संघटनाचे एकमत ; वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार ……

नायगाव प्रतिनिधी,

स्वातंत्र नायगाव जिल्हा निर्मितीसाठी व्यापक आणि निर्णायक स्वरूपाचा तीव्र लढा उभारण्याची हीच वेळ असल्याची अनेकांनी भावना व्यक्त केली आहे. मराठवाडा जनता विकास परिषदच्या पुढाकारातून नायगाव जिल्हा निर्मिती साठी सर्वपक्षीय सर्व संघटनेच्या प्रमुख नेत्यांची कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण संवाद बैठक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अवचित्य साधत नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालय येथे संपन्न झाली आहे.

देशाच्या लोकसभा मतदारसंघ व सदस्य संख्येत लोकसंख्येच्या नुसार देशामध्ये संभाव्य 850 च्या दरम्यान लोकसभा सदस्यांची संख्या होणार असल्याचे देशाच्या संसदेमध्ये हालचाली सुरु असून त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या पाहता जिल्ह्याच्या विस्तारात तीन लोकसभा मतदार संघा इतकी लोकसंख्येच्या नुसार विभागणी होत असल्याचे दिसत आहे. नायगाव तालुका हा भौगोलिक दृष्ट्या  केंद्रबिंदू असल्याने  नायगावची जिल्हा निर्मिती झाल्यास विकास कामांना मोठी चलना मिळेल  आणि इथला व्यापार, शिक्षण बाजारपेठ दळणवळणाची प्रमुख सोय उपलब्ध होईल. देशाच्या संभाव्य लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढवत यामध्ये प्रामुख्याने किनवट तालुका व उदगीर तालुक्याची जिल्हा निर्मितीमध्ये नाव समाविष्ट असून त्याचबरोबर नायगाव तालुक्याचा नायगाव जिल्हा निर्मितीसाठी मराठवाडा जनता विकास परिषद च्या माध्यमातून नायगाव जिल्हा निर्मिती व्हावी यासाठी रास्त मागणी घेऊन कृती समितीने राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सर्वांच्या सहमतीने  केंद्र सरकारकडे  प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीने नायगाव जिल्हा निर्मितीसाठी रीतसर प्रस्ताव पाठवून शासनाकडे मागणी होत असल्याचे दिसून येत आहे.

नायगाव जिल्ह्यासाठी सहा मतदार संघातील प्रमुख नेत्यांची कार्यकर्त्यांची बैठकीतून एकमत झाल्याची दिसून येत आहे. यामध्ये नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा व देगलूर बिलोली विधानसभा मुखेड विधानसभा कंधार लोहा विधानसभा याचा प्रामुख्याने समावेश करून नायगाव जिल्हा निर्मितीसाठी मराठवाडा जनता विकास परिषद च्या माध्यमातून आंदोलन पुकारण्याचे संकेत सुद्धा यावेळी देण्यात आली आहे. वेळ प्रसंगी बलिदान देऊ पण नायगाव जिल्हा निर्मिती झालीच पाहिजे या अग्रही मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. या आंदोलनामध्ये कुठल्याच पद्धतीची राजकीय भूमिका न ठेवता सर्वांनी एकमताने पुढे येऊन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावेत असे कृती समितीच्या वतीने विनंती देखील करण्यात आली आहे.

नायगावच्या जिल्हा निर्मितीसाठी गट तट पक्ष संघटना बाजूला ठेऊन तीव्र आंदोलन उभारू — खा. रवींद्र चव्हाण

यापूर्वी नायगाव तालुका निर्मितीसाठी असेच अनेक आंदोलने पुकारावे लागले तेव्हा नायगाव ची निर्मिती झाली याच नायगाव साठी जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन पुकारण्याची वेळ आली तर आपण सर्वांनी नायगाव जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन पुकारू. नायगाव तालुका निर्मितीसाठी अनेकांनी योगदान दिलं आहे आणि नायगाव तालुक्याच्या विकासात सर्वपरीने प्रयत्न करून नायगाव शहरामध्ये मोठी बाजारपेठ, शिक्षणाची व्यवस्था व्यापारासाठी व्यवस्था या दृष्टीने तयार करण्यात आली नांदेड जिल्ह्याच्या नंतर नायगाव तालुक्यातच पंचतारांकित औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. भविष्यात जिल्हा निर्मिती ही नायगाव जिल्ह्यासाठी जी व्यवस्था आणि जे विकास कामे लागतात त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जातो त्या माध्यमातून नायगावच्या विकासामध्ये मोठी चालना मिळेल हे मात्र निश्चित. नायगाव तालुका हा जिल्ह्याचा केंद्रबिंदू असून नायगाव तालुक्यापासून वीस पंचवीस किलोमीटर असलेले तालुके हे नायगाव साठी सोयीचे ठरणार आहेत. एकूणच कमी वेळामध्ये नायगाव जिल्हा लोकांच्या सोयीचे आणि फायदायक ठरणार आहेत. त्यासाठी नायगाव जिल्हा निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून जिल्ह्याची निर्मिती व्हावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या समित्या गठीत करून त्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी खा. रवींद्र पाटील चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, बालाजी कम्पलवाड, मोहनराव पाटील तुपेकर, नागोराव पाटील रोशनगावकर, सय्यद रहीम साहेब, युवा नेते गजानन पाटील चव्हाण, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, यासह विविध पक्षातील संघटनातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular