HomeBlogनायगाव येथे बँक ऑफ इंडियाचा १२१ वा स्थापन दिन उत्साहात साजरा .....नायगाव,अशोक...

नायगाव येथे बँक ऑफ इंडियाचा १२१ वा स्थापन दिन उत्साहात साजरा …..नायगाव,अशोक वाघमारे

नायगाव येथे बँक ऑफ इंडियाचा १२१ वा स्थापन दिन उत्साहात…..

नायगाव प्रतिनिधी,

    समृद्ध वारसांचा अभिमान, उज्वल भविष्याकडे मोठी वाटचाल बँक ऑफ इंडियाचा १२१ वर्षांचा विश्वास सामर्थ्यशाली वारसा आणि उज्वल भविष्याची प्रेरणा देत राहणारी सर्वांच्या विश्वासाची हमी असणारी बँक ऑफ इंडिया चा १२१ वा विस्थापन दिन मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमाने नायगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव च्या वतीने १२१ वर्षांचा ग्राहकांचा विश्वासाचा केक कापून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 बँक ऑफ इंडिया स्थापना दिनानिमित्त ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण व बँक ऑफ इंडिया च्या समोर ग्राहकांना व नागरिकांना फल वाटप करून यासह विविध सामाजिक उपक्रमाने आणि शेतकरी जन कल्याणकारी योजना व बँकेच्या ग्राहकासाठी आणि ठेवीदारासाठी महत्त्वपूर्ण योजनेसह सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडियाचा १२१ वर्षाचा ग्राहकांच्या विश्वासहर्त व उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी प्रवास यातून विविध प्रकारच्या सवलती ग्राहकासाठी आणि शेतकऱ्यांना व महिला बचत गट सक्षमीकरणासाठी देण्यात आलेलीअर्थिक पाठबळ अशा प्रेरणादायी उपक्रमातून बँक ऑफ इंडियाने १२१ वर्षाचा पल्ला गाठून जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेली ही बँक असून बँकेच्या उज्वल व प्रेरणादायी परंपरेमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ होत गेला आहे.
 बँक ऑफ इंडिया ने विश्वासाची परंपरा व उज्वल भविष्यासाठी शतकाहून अधिक काळ ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या बँक ऑफ इंडिया यांचा १२१ व्या स्थापन दिनानिमित्त बँकेचे सर्व ग्राहक ठेवीदार व हितचिंतक यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आले आहे. 

यावेळी बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक शंकर मेहत्रे, पद्माकर कुरे, नागेंद्र नाईकवाडे, प्रियंका राजारप्पू, माया कदम,प्रभाकर जाधव, ललेश डबकलवार, यासह सर्व कर्मचारी,अधिकारी, मेजर सह उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular