HomeBlogस्व.मनोहरराव लोकमनवार यांच्या प्रथमपुण्यस्मरणानिमित्त हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे कीर्तन....नायगाव, अशोक वाघमारे

स्व.मनोहरराव लोकमनवार यांच्या प्रथमपुण्यस्मरणानिमित्त हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे कीर्तन….नायगाव, अशोक वाघमारे

स्व.मनोहरराव लोकमनवार यांच्या प्रथम
पुण्यस्मरणानिमित्त हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे कीर्तन….

आई-वडिलांची सेवा हीच खरी पंढरीची वारी – हभप पुरुषोत्तम पाटील महाराज

हजारो भक्तांच्या महासागरात स्व.लोकमनवार यांना पुष्पांजली…..

नायगाव प्रतिनिधी

नायगाव पासून जवळ असलेले बिलोली तालुक्याच्या इतिहासात भक्तीचा एक अविस्मरणीय क्षण ठरलेल्या कासराळीतील भव्य दिव्य किर्तन सोहळ्यात स्व. मनोहरराव लोकमनवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भागवताचार्य, प्रखर वक्ते, परमपूज्य हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे कीर्तन अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या सोहळ्याने केवळ एक पुण्यस्मरण नव्हे, तर संस्कार आणि श्रवण भक्तीचा आदर्श घालून दिला.
दोन भावंडांचे आदर्श नियोजन
या संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन स्व. मनोहरराव लोकमनवार यांचे सुपुत्र भागवत लोकमनवार व ज्ञानेश्वर लोकमनवार यांनी केले होते. वडिलांच्या पश्चात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी केवळ रूढी-परंपरा न पाळता, समाज प्रबोधन होईल असा अध्यात्मिक कार्यक्रम घ्यावा, या उदात्त हेतूने या दोन्ही भावांनी हा सोहळा आयोजित केला.
कुटुंबातील व्यक्तीचे पुण्यस्मरण कसे असावे याचा आदर्श लोकमनवार बंधूंनी घालून दिला आहे, अशी चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. कार्यक्रमासाठी मंडप, ध्वनी व्यवस्था, भाविकांसाठी बैठक व्यवस्था आणि महाप्रसादाचे अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.
१० हजार भाविकांनी घेतला भक्तीचा लाभ
या कीर्तन सोहळ्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली होती. नायगाव, बिलोली, देगलूर, नरसी, मुदखेड, नांदेड, भोकर, उमरी, धर्माबाद परिसरासह आजूबाजूच्या गावांमधून जवळपास दहा हजार भाविक भक्तांनी या कीर्तनाला हजेरी लावली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे आगमन होताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
कीर्तनातून जीवनाचे सार
आपल्या तब्बल दोन तासांच्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण निरूपणातून महाराजांनी उपस्थितांना खिळवून ठेवले.
“आजची पिढी पैशाच्या मागे, प्रतिष्ठेच्या मागे धावत आहे, पण घरात असलेल्या चालत्या-बोलत्या देवाला विसरत आहे. आपले आई-वडील हेच आपले पहिले दैवत आहेत. त्यांच्या डोळ्यात पाणी आणून तुम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या, तरी त्याचे पुण्य मिळणार नाही. आई-वडिलांची सेवा करा, हिच खरी ईश्वर सेवा आहे, हिच खरी पंढरीची वारी आहे,*” असे सांगताच संपूर्ण मंडपात एकच शांतता पसरली आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज
यांच्या अभंगांचे दाखले देत कुटुंब व्यवस्था, संस्कार आणि मातृ-पितृ भक्तीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी लोकमनवार परिवाराच्या वतीने भागवत लोकमनवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. भंडारा महाप्रसादाने या भव्य दिव्य पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आशिया सचिव श्री बालाजी पाटील खतगावकर माजी आमदार राम पाटील रातोळीकर माजी आमदार सुभाषराव साबणे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री शिवराज पाटील होटाळकर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष सौभाग्यवती मीनल पाटील खतगावकर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश देशमुख कुंटूरकर भाजपा नेते बालाजी बच्चेवार भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे भाजपा जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे बिलोली चे माजी नगराध्यक्ष यादरावजी तुडमे विजय कुंचनवार बिराजदार गुरुजी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील हायगले भाजपा मा. तालुकाध्यक्ष चंदू पाटील सावळेकर श्री धनराज शिरोळे मा. जी प सदस्य सूर्याजी चाळकर उद्योगपती श्री वसंत सेठ मेडेवार राजेश्वर मेडेवार सदानंद बेडेवार गंगाधर सेट कटकमवार ज्ञानेश्वर चिद्रेवार मनोज आरगुरलवार बाळासाहेब पांडे नरेंद्र येरावार योगशिक्षक श्री सुरेश लंगडापुरे अजित शेठ उत्तरवार शिवाजी पाटील वडजे कृष्णा दम कोंडवार अविनाश पाटील पवार अण्णासाहेब पाटील पवार संजय पाटील मोरे विजय करंदीकर सगरोळीचे श्री देविदास रावजी देशमुख साईनाथ मेडेवार गंगाधर शेठ शंकरवार श्री दाचावार सेठ गगन लाभशेठवार रावसाहेब पाटील मोरे माजी सरपंच दत्ता पाटील मोरे इत्यादी उपस्थित होते…

“विशेष म्हणजे भजनापूर्वी व भजन चालू असताना मोठ्या प्रमाणात वरून राज्याचे आगमन होऊन सुद्धा एकही भाविक भक्त जागेचा हल्ला नाही हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होय यावरून राजाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे “

RELATED ARTICLES

Most Popular