Homeराजकीयकुष्णूर गणातून आ. राजेश पवार यांचे समर्थक राजेश वाघमारे हे इच्छुक……

कुष्णूर गणातून आ. राजेश पवार यांचे समर्थक राजेश वाघमारे हे इच्छुक……

नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे.

सध्या होऊ घातलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले असून अनेक पक्ष व कार्यकर्ते आप आपल्या सोयीने कामाला वेग दिला आहे. यातच नायगाव तालुक्यातील एकूण चार जिल्हा परिषद सर्कल असून यात कुंटूर,बरबडा, नरसी, मांजरम चा समावेश आहे. आणि बरबडा सर्कल खुल्ला प्रवर्ग महिला तर कुंटूर सर्कल नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी ठेवण्यात आला आणि नरसी सर्कल व मांजरम सर्कल अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. बरबडा सर्कल मधील कुष्णूर गणातून आ. राजेश पवार यांचे कठ्ठर समर्थक राजेश वाघमारे वंजारवाडीकर हे अधिकृत इच्छुक उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. बरबडा सर्कल खुल्ला प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे तर कुष्णूर गण अनु. जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आणि बरबडा गण खुल्ला प्रवर्गासाठी ठेवण्यात आला असून या सर्कल मध्ये रंगतदार लढत होण्याची शक्यता मानली जात आहे. याचे कारण असे की बरबडा सर्कल खुला प्रवर्ग महिलासाठी असल्याने भाजपा आ. राजेश पवार यांच्या अर्धांगिनी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूनमताई पवार यांचे नाव देखील यांचे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. सौ. पूनमताई पवार यांचा जनसंपर्क बरबडा सर्कलमध्ये चांगल्या प्रकारे आहे. या सर्कलमध्ये पवार दांपत्याने केलेली काम याच कामाच्या जोरावर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूनमताई पवार भाजपकडून इच्छुक असल्याचे जनसामान्यातून सांगण्यात येत आहे.

कुष्णूर गण हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्याने भाजपकडून राजेश वाघमारे वंजारवाडीकर हे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. राजेश वाघमारे हे वंजारवाडी येथील असून त्यांनी तब्बल पंधरा वर्षापासून आमदार राजेश पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. मागील दहा वर्षापासून भाजपा बूथ प्रमुख म्हणून काम अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्याने त्यांच्यावर पुन्हा नायगाव तालुका मागासवर्गीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राजेश वाघमारे यांचा जनसंपर्क  बरबडा सर्कल मध्ये चांगल्या प्रकारे असल्याने कुष्णूर गणासाठी राजेश वाघमारे यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे. राजेश वाघमारे हे कुष्णूर गणातून भाजपकडून अधिकृत इच्छुक उमेदवार म्हणून असल्याची चर्चा होत आहे.

बरबडा सर्कल मध्ये गेले अनेक वर्षापासून रंगदार लढती व अटीतटीच्या निवडणुका झाल्या मात्र आगामी निवडणुकीत देखील या सर्कलमध्ये मोठी चुरशीची व रंगतदार लढत होण्याची शक्यता मानली जात आहे. कारण या सर्कलमध्ये पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती मात्र मागील काही वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालत झाल्याने येथील काही राजकीय समीकरणे बदलले गेले आहे.अर्थात या सर्कलमध्ये भाजपचे भारदस्थ नेते तयार झाल्याने या सर्कलमध्ये भाजपचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र या सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील मोठी ताकद असल्याचे बोलले जात आहे. एकूणच या सर्कलमध्ये सर्व पक्ष ताकदीनिशी लढणार हे मात्र निश्चित असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे यांची सुपुत्र मनोज पाटील मोरे हे भाजपात प्रवेश करत असल्याने पुन्हा भाजपाला मोठे बळ मिळण्याची शक्यता मानल जात आहे. या निवडणुकीत मनोज पाटील मोरे हे देखील बरबडा सर्कल मध्ये इच्छुक म्हणून उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बरबडा सर्कल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नांदेड ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड राहिलेले शिवराज पाटील होटाळकर हे देखील इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी देखील इच्छुक आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या पत्नी देखील इच्छुक म्हणून असल्याची चर्चा होत आहे. आणि या लढतीत इतर दिग्गज मंडळी देखील अधून मधून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. कारण नायगाव तालुक्यातील एकमेव खुला प्रवर्गासाठी असलेला सर्कल म्हणून या सर्कल कडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बोलले जात आहे.

बरबडा सर्कल व दोन गणांमध्ये भाजपकडून दोन दिग्गज उमेदवार ठेवण्याची शक्यता तर कुष्णूर गणातून भाजपकडून अनु. जाती मधून राजेश वाघमारे हे सक्षम व युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आणि आमदार राजेश पवार यांचे अति विश्वासू म्हणून त्यांची ओळख म्हणून कुष्णूर गणातून राजेश वाघमारे यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकट :-

मी मागील पंधरा वर्षापासून भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आणि आमदार राजेश पवार साहेब यांचा समर्थक म्हणून माझी ओळख या भागामध्ये आहे.आणि मागील दहा वर्षापासून भाजपा बुथ प्रमुख म्हणून मी काम केले आहे. माझ्या कामाचा वेग पाहता पक्षाने मला पुन्हा अनु. जाती चे तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. त्याच माध्यमातून मी या भागांमध्ये जनसेवा चे काम करीत आहे. या सर्व माझ्या कामाचा विचार करून पक्षाने मला संधी दिल्यास निश्चितपणे जनतेच्या सेवेत 24 तास राहणार व जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यात निश्चितपणे प्रयत्न करणार…. राजेश वाघमारे वंजारवाडी वंजारवाडीकर.

RELATED ARTICLES

Most Popular