HomeBlogस्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलैदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन;देगलूर...

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलैदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन;देगलूर येथील पत्रकार परिषदेमधून जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांची माहिती….नांदेड प्र. अशोक वाघमारे

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलैदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन;देगलूर येथील पत्रकार परिषदेमधून जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांची माहिती….

नांदेड,

देगलूर,दि.२० जुलै २०२६
देगलूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालय,उदगीर रोड,देगलूर येथे आज (दि. २० जुलै २०२६) स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक व जनहिताच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी यावेळी पत्रकार परिषदेमधून देण्यात आली आहे.

सदर पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आठवडाभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, लक्ष्मीकांत सावकार पद्दमवार,मधुकर नारलावार,नंदकिशोर शाखावार,व्यंकट कांबळे, देवेंद्र सावकार मोतेवार, मिलिंद रामचंद्र बीरकंगन, मनोज तोटावर,बालाजी मैलागिरे,दिगंबर कडालवार, अनिल बोनलावर,प्रा. उत्तमकुमार कांबळे,सय्यद सर,अथर हाश्मी,खालिद पटेल,दिगंबर कौरवार,सादक भाई, पाशा भाई,ओमकार उल्लेवार,विकास मोरे, शरीफ मामू,मोईन मिस्त्री,संजय चिन्नामवार,राज गायकवाड,सय्यद मोहियोद्दीन,शेख शरीफ, ध्याडे अप्पा,संतोष उंगरूतवार,अनिल तोतडे, योगेश मैलागिरे तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक,जनजागृती व लोकहिताच्या उपक्रमांची रूपरेषा मांडण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular