नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे
शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचार प्रेरणेतून कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष नात्याने सामाजिक सेवेची वृत्त अंगी घेऊन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बालक आश्रम चालविणारे मौजे शेळगाव छत्री येथील रेखाताई बनसोडे देवकर यांना नुकताच मुंबईतील लोकसंसद जन प्रेरणा शिखर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक निस्वार्थी समर्पण दूरदृष्टी आणि प्रेरणादायी प्रयत्न करणाऱ्या श्रीमती रेखाताई बनसोडे देवकर यांच्या कार्याची दखल घेऊन विश्वनायक लोकसंसद फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दिग्दर्शक मनमोहन देसाई,अभिनेता रोहित कोकाटे,अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड,आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओम प्रकाश शेट्टे, सदर संस्थेचे अध्यक्ष सुरेश यादव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते लोकसंसद जन प्रेरणा शिखर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सन्मानावेळी व्यंकट पाटील हंबर्डे यांचीही उपस्थिती होती प्रसिद्ध मान्यवर आणि महत्त्वपूर्ण पुरस्कार प्रदान प्राप्त झाल्यामुळे रेखाताई बनसोडे देवकर यांचे शेळगाव छत्री येथील युवा कार्यकर्ते तानाजी पाटील आणेराये, अशोक कुंभार, भास्कर पाटील आणेराये, साईनाथ महाराज,रेखाताई यांचे नांदेड जिल्ह्याचे गौरी गुरू व त्यांचा सर्व संच आणि सय्यद अशीफा,बालाजी वारले,संजय लांडगे,बालाजी आर्मी,संतोष किन्हाळकर,सुनंदा जोगदंड, मनमथ मालेगावे यासह अनेकांनी रेखाताई बनसोडेचे अभिनंदन करून भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिले आहे.







