
शासकीय निवासी शाळेत डॉ. अण्णाभाऊ साठेना अभिवादन……………………………..
तालुका /प्रतिनिधी अविनाश वाघमारे
महाराष्ट्राचे नंदनवन व्हावे देश सुजलाम सुफलाम व्हावा श्रम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे दिवस सुखाचे यावेत आणि समाज एकजुटीच्या रथावर आरुढ व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे थोर महापुरुष सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नायगाव शहरातील अनुसूचित जाती, नवबौद्ध मुलाचे शासकीय निवासी शाळेत त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी सदर शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख नवाज यांच्या शुभहस्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले आहे यावेळी सदर शाळेचे शिक्षक वृंद श्री कराळे श्री हत्ते श्री सोनाळे कल्याणकर उर्फ बेंद्रीकर मॅडम व शाळेतील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती.
शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे संपर्क मो .9689802102







