HomeBlogउद्योजक मारोतराव कवळे गुरुजींची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड…..नांदेड प्रतिनिधी, अशोक वाघमारे

उद्योजक मारोतराव कवळे गुरुजींची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड…..नांदेड प्रतिनिधी, अशोक वाघमारे

उद्योजक मारोतराव कवळे गुरुजींची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड…..

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी उमरी सेवा सहकारी संस्था व स्थानिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून मारोतराव व्यंकटराव पाटील (कवळे गुरुजी) यांची बिनविरोध निवड झाल्याने उमरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती आणि विकासाभिमुख नेतृत्वाला मिळालेली ही मोठी पावती मानली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी कवळे गुरुजी सातत्याने कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. विशेषतः व्हीपीके पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण बँकिंग व्यवस्थेत शिस्त, पारदर्शकता, विश्वासार्हता आणि लोकाभिमुख कारभाराची प्रभावी परंपरा त्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
बदलत्या आर्थिक आणि बँकिंग व्यवस्थेचा सखोल अभ्यास असलेल्या कवळे गुरुजींनी नेहमीच शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले. आर्थिक शिस्त, सुयोग्य नियोजन आणि विकासाभिमुख निर्णयक्षमतेमुळे त्यांच्याबद्दल सभासद, शेतकरी आणि सहकारी संस्थांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी उपक्रमांना नवी दिशा मिळाल्याचे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही कवळे गुरुजींची ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मोठा पाठिंबा लाभला आहे.
कवळे गुरुजींच्या बिनविरोध निवडीमुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अनुभवी, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले असल्याची भावना सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासदांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्ह्यातील सहकारी संस्था, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल, तसेच बँकेची आर्थिक विश्वासार्हता आणि विकासाची गती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular