नायगाव तालुका प्रतिनिधी अशोक वाघमारे
दि. १ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका कार्यकर्ता आढावा बैठक व स्नेहभोजन कार्यक्रम स्व. डी.बी.पाटील होटाळकर स्मृती मिली मिलियन पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज नायगाव येथे संपन्न झाला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी आमदार सुभाष साबणे,माजी आमदार अविनाश घाटे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अहमद खान, शिरीष देशमुख गोरठेकर, भाऊसाहेब गोरठेकर, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, दिलीपराव धर्माधिकारी, कैलास देशमुख गोरठेकर, वसंत पाटील सुगावे ,विक्रांत देशमुख तळेगावकर,अशोक पाटील वडजे, मारुती वाडेकर , विनायकराव शिंदे मांजरमकर,यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात बोलताना शिवराज पाटील होटाळकर असे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात भक्कम पणे मोठा करू आणि कुंटूर सर्कल साठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारासाठी पोषक वातावरण असून त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला फायदा होणार पुढे बोलताना होटाळकर म्हणाले की या भागात विकास कामाचा मोठ्या प्रमाणात अभाव असून या भागातील अनेक समस्या जनतेला भेडसावत आहेत. शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेले नाही चालू असलेले रस्ते व नालीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या भागातील जनतेमध्ये नाराजी असल्याचे मला सांगण्यात आले आहे. या भागाचे आमदार पवार यांनी भ्रष्ट गुत्तेदारांच्या पाठीशी त्यामुळे या भागातील गुत्तेदार कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमयता आणत आहे. याकडे मात्र आमदार म्हणून एकदाही फिरकून बघितले नाही किंवा याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना होटाळकर म्हणाले की उमरी नायगाव धर्माबाद नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार कोणी काही म्हणू द्या त्याकडे लक्ष द्यायचं नाही तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने व जोमात कामाला लागावे आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 25 ते 30 जागा लागण्याची दिसून येत आहे. त्याच जोरावर जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असेही होटाळकर यांनी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करत असताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहणार आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न अजित दादा पवार यांनी तात्काळ मार्गी लावले आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पूरक असं पाण्याची सोय बंधाऱ्याच्या माध्यमातून करणार आणि अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्ह्याच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे. त्या मागणीला कुठलाच विलंब न लावता तात्काळ आमच्या मागणीची दखल घेऊन नायगाव विधानसभा क्षेत्रातील व देगलूर मुखेड बिलोली भागातील हजारो हेक्टर जमिनी ही भिजवणे खाली राहणार आणि शेतकऱ्यांना सुखी जीवन करून देण्याचा हा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता पुढच्या बलांडे धनशक्ती पुढे मी मागची लोकसभा निवडणूक जिंकेल की नाही असाच मला प्रश्न पडायचा पण माझ्या कामावर व कर्तुत्वावर लोक विश्वास ठेवून नांदेड जनतेनी लोकसभा सदस्य म्हणून दिल्लीमध्ये पाठवलं आणि पुरुषांचा करेक्ट कार्यक्रम या जिल्ह्यातील जनतेने केला. असा खोचक तुला खासदार अशोक चव्हाण आमदार चिखलीकर यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांचा आदर करून सर्व समावेशक अशा पद्धतीचे राजकारण आम्ही अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. आणि याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते नेते हे दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत. म्हणून या कार्यकर्त्याच्या जोरावर नायगाव उमरी धर्माबाद या तिन्ही नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यात असेही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भास्करराव पाटील बोलताना म्हणाले की, नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिवसेंदिवस वाढत आहे. आणि अजित दादा पवार यांचा कामाचा वेग पाहता या भागातील कार्यकर्ते उत्साहीत होऊन पक्षांमध्ये प्रवेश घेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने एकमताने काम करून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या जिल्ह्यामध्ये नव्याने निर्माण करून जिल्ह्यातील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोमाने तयारीला लागावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असेही माजी खासदार भास्करराराव पाटील खतगावकर यांनी म्हणाले.
यावेळी भास्करराव पाटील खतगावकर व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक कार्यकर्त्या सोनाली ताई हंबर्डे, ज्ञानेश्वर हंबर्डे, प्रल्हाद हंबर्डे,सोनू सिंधीकर यास अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहें. सदर कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हणाले की, युतीसाठी प्रस्ताव आल्यास हमी स्वीकारू पण प्रस्ताव नाही आल्यास आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वबळावर आणि ताकदीनिशी निवडणुका लढवणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणणार अशी ही आमदार चिखलीकर यांनी म्हणाले आहे. स्नेहभोजन व कार्यकर्ता आढावा बैठकीचे औचित्य आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. आजच्या दिवशी २५ ते ३० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, प्रदेश सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस ,नांदेड शहर कार्याध्यक्ष माधव पावडे,अशोक पाटील मुगावकर,राजू गंदीगुडे,अंकुश देसाई, देवेंद्र मोतेवार,रंजीत हिवराळे तालुकाध्यक्ष बिलोली,भीमराव जेठे,उत्तम गवाले, विश्वनाथ बडूरे,जीवन चव्हाण,शिवराज गाडीवान,अशोक पाटील वडजे,सुनील एम्बडवार,ऍड.नाज शेख,भाग्यश्री गायकवाड,शिवाजी पाटील जाधव,नंदू पाटील रातोळीकर,सुधाकर देशमुख, श्रीपत शिंदे मांजरमकर,संजय भांगे, पुंडलिक नवारे,यांच्यासह परिसरातील बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.सदरील आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपत पाटील शिंदे यांनी केले तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले आहे.यावेळी नायगाव उमरी,धर्माबाद,बिलोली,देगलूर येथून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.







