नांदेड प्रतिनिधि :- नागेश वाघमारे
३० ते ३५ वर्षापासून आजपर्यंत असणाऱ्या प्राथमिक नागरी समस्या…
१) आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य अशी ड्रेनेज लाईन… प्रस्तावित घरकुल योजनेच्या नियामाला डावलून केलेली ड्रेनेज लाईन… त्याचे लोकसंखेप्रमाणे योग्य नियोजन करणे.
२) वाढती व्यसनाधिनता त्याला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत नियोजन करून वाढती व्यसनमुक्ती करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे… त्यासाठी महापालिकेकडे विशेष अशी निधी तरतूद आहे ती अमलात आणणे.
३) विशेष म्हणजे प्रभागातील लाईट व्यवस्था ही सुरळीत करणे… कारण मीटर दिले असले तरी त्यावरील लादलेला कर हा महापालिकेच्या सभागृहात विज वितरण कंपन्या यांच्या नियमाला अनुसरून योग्य प्रस्ताव तयार करून तो मंजूर करून घेऊन त्याची योग्य अंमलबजावणी करून लाईट व्यवस्था सुरळतीत करणे.
४) महापालिकेच्या मोकळ्या असलेल्या जागेत राज्याच्या शिक्षणात धोरणानुसार किड्स पार्क तयार करणे व प्रभागातील सर्व लहान मुलांना त्याचा योग्य फायदा होईल. आणि शिक्षण हे अंमलात येईल.
५) महापालिकेच्या वतीने प्रतावीत असलेले ७ सिमेंट रस्ते योग्य पद्धतीने तयार करून साइड ने जेष्ठ नागरिक यांच्यासाठी आसन व्यवस्था तयार करणे.
६) प्रभागातील लोकसंख्येचा विचार लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने एक सोईयुक्त मंगल कार्यालय तयार करणे.
७) प्रत्येक महिन्या पहिल्या आठवड्यात किंमत ३ दिवस महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे.
८) प्रस्तावित असणारे सर्व कामे तत्काळ मंजूर करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे.
९) पवाढती गुन्हेगारी वृत्ती रोखण्यासाठी रोज रात्री गृह खात्याकडून किमान दोन वेळा पेट्रोलिंग करण्यात यावी जेणेकरून सामान्य माणसाला याचा त्रास होणार नाही व गुन्हेगारीला वाचक बेडेकर.
१०) त्याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत शहीद झालेले शहीद गौतम वाघमारे यांचे रखडलेले स्मारकाचे काम पूर्ण करणे जेणेकरून राज्याला एक प्रेरणा मिळेल व दरवश्री याठिकाणी भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतील.
या आहेत प्राथमिक स्वरूपात पाहिल्या फेज मधील प्रभाग क्रमांक 7 मधील प्रस्तावित कामे अजून बरेच असे कामे आहेत जे नगरसेवक यांनी करावे पण आजपर्यंत या सर्व गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल अथवा कार्यक्षम नागसेवक म्हणावे लागेल असो पण येणाऱ्या निवडणुकीत योग्य असा नगरसेवक निवडणे ही आपली सर्वाची जबाबदारी आहे.
आपलाच
केतन भाऊराव भदरगे
(BA.MSW.DCL.SC.MT.TISS)
प्रभाग क्रमांक 7 जयभीम नगर नांदेड







