नायगाव प्रतिनिधी, अशोक वाघमारे.

घुंगराळा येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या व कृषी आणि पशु प्रदर्शन होणार…
( यात्रेत 27 नोव्हेंबर रोजी कुस्ती स्पर्धा तर 28 नोव्हेंबर रोजी कृषी व पशु प्रदर्शन होणार. वसंत पाटील सुगावे यांची माहिती.)
नायगाव प्रतिनिधी, अशोक वाघमारे.
तालुक्यातील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान असलेल्या घुंगराळा नगरीमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही खंडोबा देवाची पारंपारिक यात्रा मोठ्या उत्साहामध्ये व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. यात जंगी कुस्ती स्पर्धा कृषी व पशुप्रदर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस चा उपसरपंच घुंगराळा वसंत पाटील सुगावे दिली.
दि. २६ रोजी कुंटूर येथून खंडोबा देवाची पालखी दुपारी घुंगराळा येथे प्रस्थान करेल त्यानंतर सायंकाळी खंडोबा मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात येणार व गावकऱ्यांच्या वतीने सामूहिक आंबील जेवणाचा कार्यक्रम होणार.
दि. २७ रोजी जि प शाळेच्या मैदानावर दुपारी १:०० वाजता सुमारास कुस्ती स्पर्धांना सुरुवात होणार आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील विविध विभागाची प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दि. २८. रोजी सकाळी १०. वाजता भव्य कृषी व पशुप्रदूषणाचे आयोजन करण्यात येणार आहे यात शेती जनावरे सुधारित शेती विविध जातीचे पशु तंत्रज्ञान व उत्पादन वाढीच्या उपायावर मार्गदर्शन मिळणार आहे.सदर यात्रेनिमित्त विविध खाद्यपदार्थ दुकाने खेळणी दुकाने भांड्याचे दुकाने कापड दुकाने या सह विविध छोट्या-मोठ्या दुकाने मोठ्या प्रमाणात दुकानाचे फड उभारली जाणार आहेत. सदर यात्रेचे नियोजन ग्रामपंचायत सेवा सहकारी सोसायटी खंडोबा मंदिर ट्रस्ट यात्री समिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी यांनी पूर्णपणे जबाबदारी सांभाळत आहेत. यात्रेनिमित्त गावात ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छता दिवाबत्ती जागोजागी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर यात्रा ही सर्वांच्या सहकार्यातून व लोकवर्गणी केली जात असून घुंगराळा येथील खंडोबा देवांची यात्रा ही माळेगाव यात्रेनंतरची दोन नंबरची यात्रा म्हणून सबंध जिल्ह्यामध्ये ओळख असलेली ही यात्रा या भव्य यात्रेचा जनतेने व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे……







