
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न…..
नांदेड,
दि २१ जुलै रोजी एम एच २६ वॉटर वर्ल्ड कारेगाव ता. लोहा येथे कंधार लोहा मतदार संघाचे आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली आहे.
सदर बैठकीमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की,लोहा- कंधार मतदार संघातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आपले तीन उमेदवार सक्षम पणे उभे आहे.यात उमेदवार १)रामचंद्र मुसळे २)दिनकर दहिफळे ३) अनिल पाटील बाभळीकर हे तीनही उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील असा विश्वास आ. चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. समोर बसलेले मतदार सदस्य संख्या हे २२८ मता पैकी २२८ मत आपल्या उमेदवारांना देऊन बहुमताने निवडून आणतील असा विश्वास आढावा बैठकीतुन आमदार चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले.
यावेळी विधान परिषदेचे आ.अमर भाऊ राजूरकर ,आ राजेश पवार,मा.आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर,मा.आ माधवराव पाटील जवळगावकर,नवनिर्वाचित संचालिका प्रणिताताई देवरे चिखलीकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर,नवनिर्वाचित संचालक मारोती पाटील कवळे,नागनाथ घीसेवाड, मा.सभापती संजय आप्पा बेळगे,मा.जि प सदस्य गणेश पाटील सावळीकर,लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार,करीम शेख,आनंदराव पाटील शिंदे, भास्कर पवार,केशवराव मुकदम,पूजा केतन खिल्लारे, कंधारचे उपनगराध्यक्ष अब्दुल मनान सरवर,कंधार तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर,लोहा तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी,नगरसेवक स्वप्निल लुंगारे,पंकज परिहार,सदानंद तेलंग, तुकाराम दाढेल,शंकर वटमवार,श्रीकांत मदनवार, अविनाश पवार,गणेश बडगे, उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हातील पदाधिकारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक उमेदवार व महायुतीतील सर्व आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.









