HomeBlogकुंटूर ठाण्याच्या हद्दीतील राहेर सातेगाव च्या यात्रेनिमित्त गुडगुडी बिनधास्त सुरू गोरगरीब नागरिकांना...

कुंटूर ठाण्याच्या हद्दीतील राहेर सातेगाव च्या यात्रेनिमित्त गुडगुडी बिनधास्त सुरू गोरगरीब नागरिकांना लुटण्याचा बिनधास्त धंदा स्थानिक प्रशासनाचे डोळेझाक

कुंटूर ठाण्याच्या हद्दीतील राहेर सातेगाव च्या यात्रेनिमित्त गुडगुडी बिनधास्त सुरू गोरगरीब नागरिकांना लुटण्याचा बिनधास्त धंदा स्थानिक प्रशासनाचे डोळेझाक…

नायगाव प्रतिनिधीअशोक वाघमारे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे राहेर येथे श्री दत्त मंदिर यात्रा भरली जाते .

कावड व पालखी सोहळा आयोजित केला जातो. तीन दिवस पर्यंत चालणाऱ्या तीन दिवसापासून गुळगुळीचा खेळ बिनधास्त सुरू केला होता . याला स्थानिक प्रशासनाने ही परवानगी दिली असल्याचे स्पष्ट नागरिकांनी सांगितले. मात्र गोरगरीब जनतेला लुटण्याचा बिनधास्त हा धंदा कुंटूर पोलिसांच्याच सहकार्याने होत आहे की काय अशी चर्चा राहेर येथील नागरिकांनी केली आहे.

तीन दिवस रात्रभर हा धंदा सुरू होता मात्र प्रशासन असो व वरिष्ठ अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष गुडगुडी च्या माध्यमातून गोरगरिबाना लुटण्याचा सरस्वती मार्ग मोकळा प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे नागरिकांना लुटण्याचा हा गोरख धंदा बिनधास्त चालू होता याकडे कोणीही लक्ष दिले नाही मात्र कुंटूर सहित राहेर परिसरातील अनेक नागरिक व यात्रेला येणारे हौसे या खेळांचे महत्त्व माहिती असताना सुद्धा जास्तीचे पैशाची मिळावा म्हणुन खेळ खेळला जातो मात्र सर्वच पैसे गमावून बसल्या जातात त्यामुळे नागरिकांना लुटण्याचा हा गोरख धंदा बिनधास्त स्थानिक प्रशासनाच्या सहमतीने होतो का काय असे स्पष्ट नागरिकांत बोलल्या जात आहे. कुंटूर परिसरातील एकूण अनेक यात्रेमध्ये हा बिनधास्त धंदा चालू होता कुंटूर -3 तीन दिवस,शेळगाव छत्री -2दिवस,बळेगाव-2 दिवस, सालेगाव -2 दिवस,हंगेरगा-2 सातेगाव 2 दिवस,अशा अनेक यात्रेमध्ये बिनधास्त हा गुळगुळीचा खेळ चालू होता लाखो ते करोडो रुपयांची उलाढाल ही झाली त्यात लाखो रुपये नागरिकांची लुटले गेले तरीही प्रशासन मात्र सुस्त असून सदर गुडगुडी वाल्या वर कोणतेही आजपर्यंत कारवाई केली नसल्याचे हे विशेष म्हणावे लागेल.

त्यामुळे नागरिकांना लुटण्याचा परवानाच जणू ह्या गुडगुडी वाल्यांना स्थानिक प्रशासनाने दिली की काय अशी चर्चाही राहेर परिसरातील नागरिक करीत आहेत.

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे मो.9689802102

RELATED ARTICLES

Most Popular