HomeBlogनायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध -- बालाजी बच्चेवार..... नायगाव, तानाजी...

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध — बालाजी बच्चेवार….. नायगाव, तानाजी शेळगावकर

मतदारांनी आपले नाव, पत्ता व तपशील तपासून घेण्याचे बालाजी बच्चेवार यांचे आवाहन

नायगाव तानाजी शेळगावकर:

नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर प्रारूप मतदार यादी संबंधित मतदान केंद्रांवर तसेच मतदार नोंदणी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप मतदार यादीत आपले नाव समाविष्ट आहे की नाही, याची मतदारांनी शहानिशा करावी. यादीत नाव समाविष्ट नसल्यास नाव नोंदविण्यासाठी, एखाद्या नावाच्या समावेशास आक्षेप असल्यास अथवा मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात दावा किंवा हरकत दाखल करावी.

तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र नागरिक मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ द्वारे दावा दाखल करू शकतात. मतदार यादीतील नाव वगळणे किंवा एखाद्या नावाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ७, तर नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म क्रमांक ८ वापरता येणार आहे.

दावे व हरकती संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. संबंधित तालुक्यांमध्ये सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, यादी भागानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा असून, मतदार यादीतील अचूक नोंद ही निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. काही त्रुटी आढळल्यास किंवा नवीन नाव समाविष्ट करावयाचे असल्यास विहित मुदतीत आवश्यक दावा अथवा हरकत दाखल करावी, असे आवाहन बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular