HomeBlogघुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्याची मागणीउपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची वसंत सुगावे...

घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्याची मागणीउपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची वसंत सुगावे पाटील यांनी मुंबईत भेट घेऊन दिले निवेदन……नायगाव, तानाजी शेळगावकर

घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्याची मागणी
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची वसंत सुगावे पाटील यांनी मुंबईत भेट घेऊन दिले निवेदन……

नायगाव… तानाजी शेळगांवकर….


नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करण्यात यावी, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे शिफारस करून अग्रणी बँकेला आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भातील निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांची बुधवारी सकाळी मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन सादर केले.
घुंगराळा व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने राष्ट्रीयकृत बँकेची अत्यंत गरज आहे. ह्या परिसरामध्ये औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) असल्यामुळे या भागात उद्योग, व्यवसाय, कामगार तसेच विविध आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार आणि नागरिकांना सुलभ व सुरक्षित बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घुमराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना होणे गरजेचे आहे, असे वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शेती, व्यापार, उद्योग तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सध्या बँकिंग कामकाजासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांसह औद्योगिक व व्यापारी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून वसंत सुगावे पाटील हे घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. यापूर्वी त्यांनी यासंदर्भातील मागणी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडेही केली होती. आता उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदन देऊन या मागणीला पुन्हा गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
घुंगराळा परिसरातील वाढती लोकसंख्या, शेती-व्यवसाय आणि येथील एमआयडीसीमुळे निर्माण झालेले औद्योगिक महत्त्व लक्षात घेता येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा तातडीने सुरू करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular