HomeBlogवाढदिवसाला समाजसेवेची जोड; बच्चूभाऊ कडू यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त गरजूंना मदतीचा हात....... नांदेड प्र....

वाढदिवसाला समाजसेवेची जोड; बच्चूभाऊ कडू यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त गरजूंना मदतीचा हात……. नांदेड प्र. अशोक वाघमारे

वाढदिवसाला समाजसेवेची जोड; बच्चूभाऊ कडू यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त गरजूंना मदतीचा हात

नांदेड प्रतिनिधी —
शिवसेना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा फटाके, हार-तुरे, बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्चाला पूर्णविराम देत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला. जनसेवा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांच्या पुढाकारातून रुग्ण, दिव्यांग व विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी
उपस्थित जेस्ट मार्गदर्क मा श्री गोविंदजी कुलकर्णी सर,मारुती मंगरुळे, मारुती माटुरे, किशोर महाराज नायगावकर, गणपत पवार बेटकबोलोलीकर, शंकर आचेवाड, संजय गुजलवार, डॉ नयन रघुनाथ कल्याणकर, डॉ शरदा पाटील, शिवाजी भुताले, किरण मोरे सह हॉस्पिटल स्टॉप झोळेबाबा अपंग विद्यालयाचे साईनाथ गोपलवर सर रमेश चव्हाण सर पांगे सर देशमुख संगम प्रेमाला चौधरी,साईनाथ बोईनवाड, खंडू नरसीकर, विनोद हंजगुडे, विठ्ठल बोरीकर सह
नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर (अपघात विभाग) येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच नायगाव येथील अपंग विद्यालय व मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना पेन, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. याशिवाय नरसी येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
याचबरोबर व्यसनमुक्तीबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करून युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सुदृढ आणि समाजाभिमुख जीवन जगावे, असा संदेश देण्यात आला. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे, हीच वाढदिवसाची खरी भेट असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जनसेवा फाउंडेशनचे राज्याध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांनी सांगितले की, वाढदिवसाच्या नावाखाली होणारा अवाजवी खर्च, बॅनरबाजी, फटाक्यांची आतषबाजी किंवा दिखाऊ कार्यक्रम याऐवजी गरजूंच्या उपयोगी पडणारे उपक्रम राबविल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एका गरजू व्यक्तीला मदतीचा हात द्यावा, शिक्षण, आरोग्य किंवा सामाजिक कार्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
“वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजाप्रती आपली जबाबदारी व्यक्त करण्याची संधी आहे. गरजूंना आधार देणे, रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे, हीच खरी वाढदिवसाची आनंदोत्सवाची परंपरा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या समाजोपयोगी उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि अनुकरणीय आदर्श समाजासमोर उभा राहिला असून, अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी जनसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular