HomeBlogलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन !....सातारा प्र. अनिल वीर.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन !….सातारा प्र. अनिल वीर.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन !

सातारा : घोड्यांच्या टाफामध्ये फकिराने प्रवेश केला होता.विवंचनेत बसलेल्या भाऊंना त्यांनी विचारणा केली.तेव्हा बाळाचा जन्म झाला असून पैसा नाही. हे उत्तर एकून इंग्रजांचा क्रांतिकारक खजिना लुटून आणलेल्या फकिराने बाळगुठीला दोन ओंजळ धन बहिणीला दिले.त्यामुळेच ते बाळ पुढे तुकारामचे क्रांतिवीर अण्णाभाऊ घडले.असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते सुरेश तथा आबा मुळीक यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात व्याख्याते मुळीक बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्वधर्मसमभाव विचारांचे पाईक तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे संस्थापक अनिल वीर होते.
आबा मुळीक म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अण्णाभाऊ साठे यांना सांगितले की,पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेरू यांनी भेटायला दिल्लीला बोलावले आहे.त्यावर अण्णाभाऊंनी सांगितले,मला गरज नाही. त्यांनाच मला भेटायचे असल्याने घाटकोपरच्या चिराग झोपडपट्टीमध्ये या. अशाप्रकारचा स्वाभिमान जतन करणारी व्यक्ती अण्णाभाऊ होती.”
अनिल वीर म्हणाले,”जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव…. हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संदेशावर आधारित स्फूर्तिदायक अजरामर गीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिले आहे. या गाण्यातून गुलामगिरी, अन्याय आणि भेदभावावर घाव घालून स्वतःचे जग व जीवन सुधारण्याचा संदेश देण्यात आला आहे.तेव्हा महापुरुषांच्या विचारावरच सर्वांनी वाटचाल करणे गरजेचे आहे.”
समारोपप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड.दयानंद माने,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपट रणबागले आदींनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केली.
प्रथमतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्ष अमोल मोहिते,उपनगराध्यक्ष ऍड.दत्ता बनकर,नगरसेवक,पदाधिकारी,संयुक्त समितीच्या अध्यक्षा डॉ.पल्लवी साठे-पाटोळे, पदाधिकारी व सदस्य,सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.एल.माने,अनिल वीर, डेमोक्रॅटिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावण गायकवाड, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश गाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड (आठवले गट),दादासाहेब ओव्हाळ (दिपकभाऊ निकाळजे गट),गवई गटाचे संजय तात्या गाडे व गणेश भिसे तसेच वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे,त्यांचे पदाधिकारी- कार्यकर्ते तसेच अण्णा वायदंडे,आप्पा तुपे,उमेश खंडूझोडे,उमेश चव्हाण,अरुण पवार,रमेश गायकवाड,प्रतीक गायकवाड, आदित्य गायकवाड,अमर गायकवाड,किशोर गाल्फाडे या राजकीय पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संघटनेचे पदाधिकारी,असंख्य आंबेडकर अनुयाईनी अभिवादन केले.
सदरच्या व्याख्यानास थेरो दिंपकर (भन्ते),सतीश सुभे, सुनील महाडिक,कविता भोसले,शांताबाई जोंजाळ, वंचितचे शहराध्यक्ष मिलिंद कांबळे व युवा शहाराध्यक्ष तेजस ओव्हाळ,अजय महाडिक,द्राक्षा खंडकर, अंकुश धाइंजे, रामदास वाघमारे,कुऱ्हाडे, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular