HomeBlogआषाढी एकादशी निमित्त किलबिल व गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य पालखी व...

आषाढी एकादशी निमित्त किलबिल व गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य पालखी व शोभायात्रा…..नांदेड प्र. अशोक वाघमारे

आषाढी एकादशी निमित्त किलबिल व गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य पालखी व शोभायात्रा…..

नांदेड प्रतिनिधी,

 नायगाव शहरातील नामवंत शिक्षण संस्थेपैकी एक किलबिल प्ले स्कूल व गुरुकुल इंग्लिश स्कूल च्या वतीने  पवित्र आषाढी एकादशी निमित्त भव्य शोभायात्रा व पालखी मिरवणूक किलबिल प्ले स्कूल ते हेडगेवार चौक पर्यंत काढण्यात आली आहे.

सदर शोभायात्रेत शाळेतील लहान चिमुकल्यानी वारकऱ्यांच्या वेशभूषेत खांद्यावर ध्वज पताका आणि विना, मृदंग व गळ्यात टाळ घेऊन जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल चा नाम घोषात ही शोभायात्रा काढण्यात आली दरम्यान शाळेतील लहान चिमुकलेली डोक्यावर तुळशी वृंदावन घेत शोभा यात्रेची शोभा वाढवली आहे. या शोभायात्रेत डीजे च्या आवाजातून नाम विठ्ठल विठ्ठल व विठ्ठल आवडी च्या निनादात शाळेतील चिमुकल्याने पावलांचा ठेका धरल्याचे देखील पाहायला मिळाला आहे. विठ्ठल नामाच्या जयघोशाने मलिन झालेले सर्व विद्यार्थीनी प्रति पंढरीच्या वारीमध्ये चालल्यासारखे दिसून आले. पाऊले चालती पंढरीची वारी हेच या मिरवणूकीतून दिसून आले आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी रुक्मिणी व विठ्ठलाच्या वेशभूषा परिधान करून साक्षात विठ्ठल नामाची शाळा भरली असेच काहीतरी आजच्या पवित्र आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांमधून दिसून आले आहे. शाळेच्या परिसरात भक्तिमय वातावरण असल्याने नायगाव शहरांमधून सर्वोच्च स्तरातून कौतुक करण्यात आले आहे.

यावेळी संस्थेचे संचालक कल्याण सर, व संचालिका कल्याण मॅडम, उपस्थित शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व नर्सरी, एलकेजी, युकेजी, ते वर्ग पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

RELATED ARTICLES

Most Popular