
लोकनेते बळवंतराव चव्हाण यांच्या १९ व्या पुण्यस्मरणानिमित्त आज पुष्पांजली
नायगाव प्रतिनिधी– गोविंद नरसीकर
जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे लोकनेते तथा माजी आमदार कै. बळवंतरावजी चव्हाण यांच्या १९ व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता नायगाव येथील हनुमान मंदिर परिसरातील समाधीस्थळी भावपूर्ण पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. बळवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची भक्कम पायाभरणी केली. त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि जनसंपर्काची परंपरा आजही नागरिकांच्या स्मरणात जिवंत असून त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी विविध स्तरांतील नागरिक, कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना अभिवादन करतात.
यंदाच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित पुष्पांजली कार्यक्रमास नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते, हितचिंतक, अप्तेष्ट, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकनेत्याच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व चव्हाण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.




