
नांदेड प्रतिनिधी
……………………………..
महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड मातोश्री लोकसंचालित साधन केंद्र नायगाव अंतर्गत असलेल्या बचत गटातील महिलांना सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर गौतम खिल्लारे यांनी नायगाव शहरातील अंबिका मंगल कार्यालय येथे आयोजित महिला मेळाव्यात शेळी पालन चे प्रशिक्षण देऊन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्याची माहिती दिली .
बचत गट महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर डॉक्टर गौतम खिल्लारे यांनी शेळी पालन ची ओळख व फायदे,योग्य जातीची निवड, चारा व्यवस्थापन व पोषण आहार, रोग प्रतिबंधक उपाय व आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन व्यवस्थापन व्यवसाय व बकरी पालन तंत्र शेळीपालन व्यवसाय व आर्थिक नियोजन याबाबत सविस्तर प्रशिक्षण देऊन शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची माहिती त्यांनी दिली यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रदीप राक्षसमारे शेळगाव छत्रीचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा पत्रकार माधव बैलकवाड, पत्रकार प्रल्हाद भालेराव मातोश्री संचलिका साधन केंद्राचे व्यवस्थापक जगनाथ रेजीतवाड, सचिव ललिता पट्टेकर, सहयोगिनी सुनीता वाघमारे, सहयोगिनी उमा सूर्यवंशी,सहयोगिनी सविता बिजुरकर उपजीविका सल्लागार वृर्षीकेस क्षीरसागर लेखापाल महेश कोकणे यासह शेळगाव येथील बचत गटांच्या सौ. अनुसयाबाई शहापुरे,, सत्यभामा सालेगाये, गिरजाबाई सूर्यवंशी, ललिताबाई वाघमारे,जयश्री बैलकवाड,मीरा वाघमारे, मिनाबाई सालेगाये,चौत्राबाई बैलकवाड यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.




