HomeBlogआरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थणात नायगाव येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न….नांदेड, अशोक वाघमारे

आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थणात नायगाव येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न….नांदेड, अशोक वाघमारे

आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थणात नायगाव येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न….

नांदेड / प्रतिनिधी

   सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षण उपवर्गीकरण  संदर्भात प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर लाखोच्या संख्येने सरकारकडे संविधानिक व लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा काढून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अनुसूचित जातीतील एकूण ५८ जाती आरक्षणाच्या लाभापासून आणि स्वतःच्या हक्कापासून  वंचित असलेला जात समूह मोर्चा काढत आहे. त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या वतीने  ऐतिहासिक व भव्य महामोर्चाचे आयोजन दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. त्या ऐतिहासिक महामोर्चाच्या नियोजना संदर्भात नायगाव येथील महात्मा फुले कॉलनी मधील सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक सभागृह येथे  तालुक्यातील सर्कल निहाय प्रमुख कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण बैठक माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

यावेळी माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ भालेराव, नगरसेवक दयानंद भालेराव, नगरसेवक शरद भालेराव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम गवाले,शंकर गायकवाड, एबीएस चे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, सरपंच दत्तात्रय आईवार,प्रवीण भालेराव,कैलास भालेराव, गंगाधर कोत्तेवार, जीवन वाघमारे, नामदेव गायकवाड,प्रल्हाद भालेराव,मधुकर आयलवार, पत्रकार अशोक वाघमारे, यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित.

अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण समर्थणार्थ मातंग समाजाच्या वतीने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले दरम्यान विविध सामाजिक चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते आपापले विचार व्यक्त करून ऐतिहासिक व भव्य महामोर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील खेड्यापाड्यापर्यंत अनुसूचित जातीतील एकूण ५८ लाभ वंचित जातीपर्यंत व त्या समाजाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत मोर्चाचे निमंत्रण व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवावी यासाठी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीने समाजाच्या न्यायासाठी समाजाच्या हितासाठी व हक्कासाठी समाज एकजूट करून नांदेड येथील होणाऱ्या महामोर्चा मध्ये सामील करण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारून या कार्यक्रमाचे नियोजनात सहभागी व्हावं समाजातील समाज बांधवांच्या नांदेड येथील महामोर्चासाठी जाण्या येण्यासाठी सोय कशा पद्धतीने करता येतो अशा विविध प्रकारच्या महत्वपूर्ण चर्चा बैठकीत करण्यात आले आहे. सरकारने जाणीवपूर्वक अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात वेळ काढू पणा करत आहे अशा. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी समाजाची ताकद आणि समाजाची एकजूट महत्वाची असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

" नांदेड येथील आयोजित ऐतिहासिक व महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील गाव खेड्यातून लाखो समाज बांधव उपस्थित राहण्याकरिता ५८ जातीतील लाभ वंचित समाजाने पुढाकार घेऊन अगदी जबाबदारीने समाज बांधवांना एकत्रित कशा पद्धतीने करता येतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. असे आवाहन यावेळी आयोजक यांच्याकडून करण्यात आले.
 यावेळी नायगाव तालुक्यातील व शहरातील शेकडो समाज बांधवांचा समुदाय उपस्थित होता.

चौकट :-

“समाजाची अखेरची ही लढाई अभी नही तो कभी नही” — भाऊसाहेब भालेराव

नांदेड येथे होत असलेल्या ऐतिहासिक व भव्य मोर्चासाठी समाजाची एकजूट व ताकद अतिशय महत्त्वाची आहे. तेव्हा आरक्षणापासून वंचित असलेल्या एकूण ५८ जातीतील समाज बांधवांनी हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने कामाला लागलं पाहिजे. आपल्या जनसमुदायाची ताकद ही सरकारला दबाव निर्माण करू शकतो. आणि सरकारला न्याय देण्यासाठी भाग पाडू शकतो. येणाऱ्या पिढीसाठी त्यांच्या भवितव्यासाठी न्यायाचा लढा मागील ३५ वर्षापासून कायम चालू आहे. आज पर्यंतच्या कुठल्याही सरकारने याकडे दखल न घेता मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करून समाजाला दारिद्र्यात लोटला आहे. एससी प्रवर्गातील एकूण ५८ जाती हे अजूनही लाभापासून हक्कापासून वंचित राहिले आहेत. आमचा समाज शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे आमचा संघर्ष हा परिवर्तन घडविण्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. तेव्हा सरकारने त्वरित निर्णय करावा अन्यथा हा आमचा आक्रोश सरकारला खूप महागात पडेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
RELATED ARTICLES

Most Popular