HomeBlogईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे 'जुलूस ए मोहम्मदी' उत्साहात साजरी.नायगाव प्रतिनिधी

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’ उत्साहात साजरी.नायगाव प्रतिनिधी

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’ उत्साहात साजरी.

नायगाव प्रतिनिधी :


इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कुंचेली येथे ईद-ए-मिलादुन्नबी च्या अनुषंगाने दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी ‘जुलूस ए मोहम्मदी’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांसोबतच लहान मुले व मुली जुलूस मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तर यावेळी जुलूस कमेटी चे अध्यक्ष सोहेल अब्दुलसाब शेख व उपाध्यक्ष सैलानी राजेसाब शेख यांनी जुलूस यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले.
इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दि.23 ऑगस्ट 2026 रोजी कुंचेली येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली व जल्लोषपुर्ण‌ वातावरणात जुलूस ए मोहम्मदी साजरा करण्यात आला यावेळी गावातील मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी जुलूसला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक पेदे साहेब, पोलीस उप निरीक्षक पाटील साहेब,पो.कॉनिस्टेबल बेळीकर,पो.कॉनिस्टेबल रूद्र साहेब यांनी भेट देऊन चोख बंदोबस्त ठेवला तर जुलूस कमेटीच्या वतीने या सर्व कर्मचार्यांचे शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले यावेळी गावातील जेष्ठ,श्रेष्ठ, प्रतिष्ठित नागरिक व नवयुकांची लक्षणिय उपस्थिती होती सदर जुलूस यशस्वीतेसाठी जुलूस कमेटीचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular