
नांदेड,
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त नायगाव येथील कृषी महाविद्यालय प्रांगणात असलेल्या वसंत स्मृती या ठिकाणी हरी किर्तन व महाप्रसादाचे भव्य आयोजन दिनांक २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.सकाळी दहा ते बारा पर्यंत हरी कीर्तनाचा गजर होणार असून यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या अमृतवाणीतून हरी कीर्तनाचा गजर होणार आहे. प्रबोधनाचा आणि अध्यात्माचा अस्मरणीय सुरेख संगम लाभणार असून यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील नामवंत गायक वादक टाळकळी साधुसंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
नायगाव व नायगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना हरी कीर्तनाचे श्रवण व या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.




