HomeBlogआरक्षणाचा लाभ मातंग समाजाला मिळाला पाहिजे,सौ.पूनमताई पवार.... नांदेड, अशोक वाघमारे

आरक्षणाचा लाभ मातंग समाजाला मिळाला पाहिजे,सौ.पूनमताई पवार…. नांदेड, अशोक वाघमारे

आरक्षणाचा लाभ मातंग समाजाला मिळाला पाहिजे,सौ.पूनमताई पवार

नांदेड प्रतिनिधी
……………………………
सवलती आणि विकासापासून गेल्या अनेक शतकाहून अधिक मातंग समाज हा दुर्लक्षित वंचित राहिलेला आहे याबाबत आमदार राजेश पवार यांनी तीन वेळा समाजाच्या या प्रश्नासाठी विधानसभेत मागणी मांडली आहे तेव्हा खऱ्या अर्थाने आरक्षणाचा लाभ हा मातंग समाजाला मिळाला पाहिजे असे प्रखड मत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ पूनम ताई पवार यांनी देगाव येथे व्यक्त केले.

तालुक्यातील मौजे देगाव येथे सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ जयंती निमित्त आमदार राजेश पवार यांच्या सौभाग्यवती पुनमताई पवार यासह प्राचार्य लक्ष्मण कोंडावार, रणजीत पो.पा. मोरे,रावसाहेब पाटील मोरे, गणपत रेडी, रावसाहेब पवार, पी एस वाघमारे, राहुल गायकवाड,माजी पीएसआय शेषराव रोडे यांच्या हस्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यासह सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करून अभिवादन केले. तर क्रांती लाल ध्वजाचे ध्वजारोहण सौ.पुनमताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी एस वाघमारे हे होते तर प्रस्ताविक मध्ये माजी पीएसआय शेषराव रोडे यांनी डीजे विना जयंती साजरी करावी अन्यथा भविष्यात समाजाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सांगत आमदार प्रतिनिधी पूनमताई पवार यांच्याकडे काही समाजाच्या मागण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे सौ.पवार बोलताना पुढे म्हणाल्या की,डॉक्टर अण्णा भाऊ साठे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांनी समाजासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्ची घातले तेव्हा आपणही हा इतिहास पुढे न्यावा आपल्या विकासाबाबत आमदार राजेश पवार हे कटिबद्ध आहेत असेही त्या म्हणाल्या. यावेळी रामदास कांबळे, दत्ता पाटील मोरे, संभाजी पाटील मोरे, गंगाधर गायकवाड, पांडुरंग मोरे, अविनाश गायकवाड,भीमराव गायकवाड,माजी सरपंच संभाजी गायकवाड, बाबुराव शेरे आदी महिला पुरुष उपस्थित होते.सूत्रसंचालन माधव गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी साठी जयंती मंडळ पदाधिकारी मारुती रोडे संतोष रोडे दत्ता रोडे सुभाष रोडे धोंडीबा वाघमारे विठ्ठल रोडे आशिष रोडे गोविंद रोडे अंकुश रोडे माधव रोडे,विठ्ठल माधव रोडे यांनी परिश्रम घेतले आहे.
चौकट………………………….. आपले विचार व्यक्त करून कार्यक्रमातून जात असताना मुद्दामहून उपस्थित महिलांमध्ये जाऊन खाली बसत हे मला खूप आवडते त्यात मी समाधान मानते असा मनाचा मोठेपणा सौ.पुनमताई पवार यांनी दाखवले

RELATED ARTICLES

Most Popular