HomeBlogकोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या -- शिवराज पाटील होटाळकर...नायगाव,...

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या — शिवराज पाटील होटाळकर…नायगाव, अशोक वाघमारे

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या — शिवराज पाटील होटाळकर…

नायगाव प्रतिनिधी,

दि.९ सप्टेंबर रोजी नायगाव येथील तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार यांना एका निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यावर असलेले भीषण महासंकट पावसा अभावी शेतातील पिके करपली यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान शेतकऱ्यावर होत असलेली उपासमारीची वेळ शेतकरी पहिलेच कर्जबाजारी झालेला पुन्हा त्यांच्यावर दुहेरी संकट असल्याने शासनाने त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई सह शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.

मागील दोन महिन्यापासून सातत्याने पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी शेतातील पिकाला करपा बसला असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिंता आहे. शेतातील असलेले सोयाबीन,उडीद,मूग,कापूस तूर इत्यादी पिकाना पावसाअभावी पिकांना बळ मिळत नाही व पिके करपून जात आहे.आणि सोयाबीन पिकावर येल्लो मोजागचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाळा हे कोरडा जात असून जून -जुलै महिन्यामध्ये तुरळक पाऊस पडल्याने पिकांना तूर्तास जीवनदान मिळाले मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अद्यापही पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकावर मोठे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे एकूणच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा आढावा घेत जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार यांच्यामार्फत सरकारकडे मोठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

यावेळी उपस्थित श्रीपत पाटील शिंदे ,महिला तालुकाध्यक्ष सोनाली ताई हंबर्डे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील पवळे, रावसाहेब पाटील बेलकर, आनंदराव पाटील हेंडगे, महेश पाटील हंबर्डे ,गजानन पाटील हंबर्डे, सुरज पाटील कदम, दयानंद पाटील मोरे ,माधव पाटील उपाशे,राम पाटील कदम, साईनाथ पाटील वडगावकर ,सुधीर पाटील पवार ,गजानन पाटील शिंदे, लक्ष्मण पाटील उपाशे राम पाटील उपाशे,गोविंद पाटील कदम ,आदी कार्यकर्ते व नागरिक ,शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular