Homeमनोरंजनतीर्थक्षेत्र राहेर येथे संत निवास भूमिपूजन सोहळा व पारायण सांगता सोहळात भक्तांची...

तीर्थक्षेत्र राहेर येथे संत निवास भूमिपूजन सोहळा व पारायण सांगता सोहळात भक्तांची मांदियाळी……..

नायगाव / प्रतिनिधी


अशोक वाघमारे.

तालुक्यातील राहेर येथे संत बाळगीर महाराज यांची जन्मभूमी म्हणून परिचित व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र राहेर भूमीमध्ये श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त गुरुभक्त मंडळीच्या वतीने श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या जीवन चरित्र ग्रंथाचे १०२८ भक्तगणाचे सामूहिक पारायण सांगता सोहळा जिल्ह्यातील सर्व साधुसंत महंतच्या गुरुमार्गदर्शनाने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

तीर्थक्षेत्र राहेर येथे संत निवास नव्याने उभारण्यात येणाऱ्या वास्तुसाठी राहेर व राहेर परिसरातील भक्तगणांनी देणगीच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे पवित्र वास्तू आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांची जन्मभूमी देवस्थान असून देणगी स्वरूपात देणगी देऊन सदर वस्तूचे काम ५० कोटी रुपये एवढ्या अंदाजित रकमेचे काम होणार अशी माहिती महंत यांच्याकडून देण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पू.सद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज ( श्री दत्त मंदिर मठ संस्थान पिंपळगाव ), संत निवास भूमिपूजन सोहळा शुभ हस्ते माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपखेडे, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश पवार यांच्या अर्धांगिनी सौ पुनम ताई पवार, राजेश देशमुख कुंटूरकर, मारोतराव कवळे गुरुजी,श्रावण पाटील भिलवंडे,माणिक जाधव, माणिकराव लोहगावे, लक्ष्मणराव ठक्करवार, दत्ता पा. कोकाटे, सूर्याजी चाडकर, रमेश पारसेवार,महेश देशपांडे, बापूसाहेब पाटील कौडगावकर,दत्ताहरी पाटील चोळाकेकर, यासह अदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करत असताना श्री व्यंकट स्वामी महाराज यांनी नवयुवकांना व्यसनापासून दूर होण्याचे मौल्यवान संदेश देऊन हिंदू धर्माचे व सनातनधर्माचे महत्त्व उपस्थित त्यांना पटवून दिले आहे. धार्मिक कार्यात संता बरोबर राजकीय नेत्यांचा देखील मोठा आश्रय लागतो राहेर येथे २०२८ च्या कुंभमेळाव्यासाठी जागतिक दर्जाचे संत धीरेंद्र शास्त्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासह देशातील विविध संत महंत मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंदिर परिसरामध्ये ३०० ते ४०० एकर जमीन लागण्याची शक्यता असेही या पवित्र कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे आहे.श्री व्यंकट स्वामी महाराज यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना म्हणाले आहे.

खा. अशोकराव चव्हाण:-
राहेर तीर्थक्षेत्र येथे 2018 मध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी जी लागेल ते मदत आम्ही जिल्ह्यातील खासदार स्थानिक आमदार यांना सोबत घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहेर येथील तीर्थक्षेत्र अ दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आणि राहेर येथील संत निवास ही वास्तू सर्वांच्या सहकार्यातून २०२८ पूर्वी पूर्णत्वास नेणार नाशिक येथे २०२७ मध्ये कुंभमेळा व नंतर २०२८ मध्ये कुंभमेळावा बाहेर येते होणार राहेर येथील कुंभमेळावा हे सर्वांच्या स्मरणार्थ राहण्यासारखा अशा प्रकारचे नियोजन राहेर येथे होणार पुढील तीन वर्षाचे नियोजन आत्तापासून होणार पुढचा कार्यक्रम कसा याची कल्पना करता येत नाही ही खऱ्या अर्थाने साधू संतांचा आशीर्वाद आहे. आपण सर्व हिंदू आहोत म्हणून रोज देवांचे दर्शन पूजन करून पुढील काम करावे या तीर्थक्षेत्र असलेल्या राहेर भूमीचा इतिहास होईल असा विकास या भागामध्ये होणार असेही खासदार चव्हाण यांनी म्हणाले आहे.

खा.अजीत गोपछडे:- जिल्ह्यातील सर्व देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून काम करू या सर्वांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करून देणार मी व माझ्या राज्यसभा खासदार निधीतून दरवर्षी या वास्तूसाठी पंचवीस लाख रुपये निधी देणार. राहेर तीर्थक्षेत्र हे ज्ञानाचं व धार्मिक स्थळ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. म्हणून या संत निवास पवित्र वास्तूसाठी सर्वांनी होईल तेवढी मदत करावी आणि २०२८ मध्ये होणारा कुंभ मेळावा देखना होईल असेही खासदार अजित गोपछडे यांनी म्हणाले आहे.

सदर संत निवास बांधकामासाठी नांदेड लोकसभा खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून 25 लाख रुपयांची देणगी देण्याचे आश्वासित करून पवित्र कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून ही वस्तू ऐतिहासिक स्वरूपात होण्याकरिता सर्वांनी मदत व परिश्रम घ्यावे असेही बोलताना खा. रवींद्र चव्हाण यांनी म्हणाले.

यावेळी सौ पूनमताई पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले या भागाच्या विकासासाठी आमदार राजेश पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून या भागाचा कायापलट करण्याचे देह जोपासले आहे. राहेर नगरीला ११ कोटी रुपयांचा निधी देऊन गावाच्या पायाभूत सुविधा व देवस्थान जीर्णोद्धारासाठी कुठल्या उद्योगाचा निधी दिले आहे. यही पुढे पवित्र संत निवासासाठी काम करणार असे ते बोलताना म्हणाले आहे.

यावेळी प्रमुख कृपा प्रसादित महंत मधुबन गुरु गंभीर महाराज, संत श्याम भारती महाराज, संत नरसम महाराज, संत अनंतपुरी गुरु दत्त पुरी महाराज, संत प्रज्ञा कक्षा भगवान गीर महाराज, महंत कृष्णा राज बाबा खमनेकर, संत योगीराज बापू, संत केशव गिरी मोहनगिरी महाराज, संत सरोजगिरी माता गुरु रुद्रगीर महाराज, संत देवगिरी गुरु सदानंद गिरी महाराज, संत चिरंजीवगीर गुरु नरेंद्र गिरी महाराज, कैलास गिरी गुरु बळकिर महाराज, संत देवपुरी महाराज, संत ज्ञानभारती गुरु दिगंबर भारती महाराज, हरिभक्त परायण कर्णभारती महाराज, संत आनंद भारती महाराज, हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर, महंत प्रयागरी गुरु देवगिरी महाराज, शिवानंद शिवाचार्य महाराज, दिगंबर शिवाचार्य महाराज, संत रामगिरी गुरु, महंत शाम गिरुशीगीर महाराज, महंत समगीर गुरु जयगीर महाराज, यासह जिल्ह्यातील साधुसंत महंत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महंत नारायणगिरीजी गुरु बालगीर महाराज, यांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजक महंत नारायणगिरी गुरु बालगीर महाराज, संत रुद्रगीर गुरुदयाळ गिर महाराज यांनी केले आहे. सदर कार्यक्रमासाठी राहेर व राहेर पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन महाप्रसादाचा आस्वाद घेऊन सायंकाळी दत्त नाम कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular