HomeBlogबिहार मधील भाजपाचा विजय मोदी वरील विश्वासाचे प्रतीक : बालाजी बच्चेवार

बिहार मधील भाजपाचा विजय मोदी वरील विश्वासाचे प्रतीक : बालाजी बच्चेवार

नायगाव प्रतिनिधी,अशोक वाघमारे

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या विजयामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनाला मोठा धक्का बसला आहे हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखविलेल्या विजयाचे प्रतीक आहे एनडीएला 200 च्या वर जागा मिळाल्याने देशाचा मूड एनडीएच्या बाजूने असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या मुद्द्यालाही बिहारच्या जनतेने साप नाकारलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी स्थानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मित्र पक्षाचा विजय होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केली आहे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार या अनुषंगाने म्हणाले की काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून भाजप सरकारवर मत चोरीचे केलेले व सर्व आरोप बिहारच्या मतदारांनी लावले आहे देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे देशातून दहशतवादी आतंकवाद भ्रष्टाचार हद्दपार होत आहे जनतेला खऱ्या अर्थाने विकास दिसतो आहे

RELATED ARTICLES

Most Popular