HomeBlogकालवश अनुसयाबाई रावसाहेब सूर्यकार अनंतात विलीन

कालवश अनुसयाबाई रावसाहेब सूर्यकार अनंतात विलीन

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे

श्रीमती अनुसयाबाई रावसाहेब सूर्यकार यांचे आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले त्या 60 वर्षाच्या होत्या त्या अतिशय मेहनती स्वाभिमानी होत्या जीवनभर संघर्ष केला त्यांनी तिन्ही मुलांना काबाडकष्ट करून शिक्षण दिलेले असून त्यांच्या पार्थिवावर दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता त्यांचे राहते गावी सुजले गाव तालुका नायगाव (खेरगाव) जिल्हा नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत त्यांच्या पश्चात तीन मुले ,सुना ,व नातवंडे असा मोठा परिवार आहे या अंत्यविधी सोहळ्याला कॉम्रेड देवराव आईलवार ,शाहीर दिगू धुमवाड ,प्राध्यापक रामचंद्र भरांडे, कॉम्रेड गंगाधर गायकवाड ,उत्तमराव गवाले, पंडित वाघमारे ,द्वारकादास राठोड, डी एन घायाळे ,डी एन मोरे ,बालाजी पाटोळे ,दया भाऊ वाघमारे ,केशव कांबळे दत्ता आईलवार, बालाप्रसाद जंगीलवाड ,शंकर गायकवाड ,वेंकट काळेवार ,विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रयत सेवाभावी संस्थेचे संचालक रमेश सूर्यकांत इरवंत सूर्यकार व राज सूर्यकार यांच्या त्या आई होत्या

RELATED ARTICLES

Most Popular