
जिल्हा प्रतिनिधी पुणे
“झोपडीतून आलेल लेकरू … आणि आज स्वतःच्या बंगल्यातला गृहप्रवेश !” — बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा थरारक प्रवासकधी काळी झोपडपट्टीत पोटाची खळगी भरायला संघर्ष करणारा एक मुलगा… आज आपल्या हक्काच्या बंगल्यात पहिला दिवा लावत उभा आहे. हा प्रवास फक्त यशाचा नाही, हा प्रवास आहे अश्रूंचा, वेदनेचा, तुटलेल्या घराचा आणि पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीचा.आणि त्या मुलाचं नाव — सूरज चव्हाण.आज सूरजने लग्नापूर्वी आपल्या नव्या बंगल्यात पवित्र गृहप्रवेश केला.स्वतःच्या पायांनी उभं केलेलं घर… स्वतःच्या घामाने कमावलेलं स्वप्न… आणि आज पूर्ण झालेली आयुष्यभराची आस.पण या दिव्याच्या उजेडात त्याच्या भूतकाळाची काळी सावली अजूनही दिसते —वडील लहानपणी दारूच्या व्यसनात बुडाले… घरात रोज रणांगण… आणि अचानक आलेली वडिलांची मृत्यूची बातमी.या धक्क्याने त्याच्या आयुष्यातील आधारस्तंभ तुटला.आईने मुलांना सावरायचा प्रयत्न केला… पण तणाव, दुःख आणि सततचा संघर्ष यामुळे तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या… दिवसेंदिवस ती खचत गेली… आणि अखेर एका दिवशी आईनेही सूरजचा हात सोडला.आई आणि आजी — दोघींचं एकाच दिवशी जाणं म्हणजे जन्मभराचं ओझं त्याच्या छातीवर बसल्यासारखं.झोपडीत मोठं झालेलं हे मूल… एका क्षणात अनाथ झालं.पण हार मानली नाही.कधीकाळी कुणाचं फोन रिचार्ज करून देणारा, कधी ट्रायपॉड उचलून फिरणारा, कधी हातावरचं काम करणारा सूरज — इंस्टाग्रामवर छोट्या रीलने चमकला…आणि पुढे “गुलीगत धोका” म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला.बिग बॉसच्या घरात तो गेल्या वर्षी म्हणाला होता —“माझ्याकडे काहीच नव्हतं… पण माझ्या बहिणींनी मला उभं ठेवलं. मला मोठं कर म्हटलं. मी मरू शकत नाही, मला जगावंच लागणार…”आज तेच मूल, तेच अश्रू, तीच जिद्द —एका टुमदार बंगल्याच्या उंबरठ्यावर नम्रपणे डोळे पुसत उभं होतं.आता तो म्हणतो —“मी लग्न करतोय… आणि माझ्या पत्नीला झोपडीत नाही, घरात न्यायचं होतं. म्हणून हा गृहप्रवेश आधी केला.”सूरज चव्हाण आज फक्त बिग बॉस विजेता नाही…तो प्रेरणा आहे त्या प्रत्येकाला, ज्यांच्या घरात अंधार आहे पण डोळ्यात अजूनही प्रकाश जिवंत आहे.







