HomeBlogराजेश देशमुख कुंटूरकर यांच्या संवाद बैठकीला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद…

राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या संवाद बैठकीला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद…

नायगाव तालुका प्रतिनिधी अशोक वाघमारे

राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या संवाद बैठकीला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद……

आज दि. १९ रोजी राजेश कुंटूरकर यांच्या निवासस्थानी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला कुंटूर सर्कल मधील हुस्सा गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आणि सदर बैठकीत राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या पाठीशी हुस्सा गावाकऱ्यांनी मोठी साथ देखील घातली आहे. कुंटूर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी ठेवण्यात आला असून या सर्कलमध्ये पंचायत समिती कुंटूर गन हा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित करण्यात आला आहे तर देगाव गण हे सर्वसाधारण महिलासाठी ठेवण्यात आला आहे. या सर्कल मध्ये मोठी चुरस होण्याची शक्यता मानली जात असली तरीही राजेश देशमुख कुंटूरकर यांचा जन संपर्क पाहता कुंटूरकर यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. कारण राजेश देशमुख कुंटूरकर हे प्रस्थापित घराणे असून गेल्या अनेक वर्षापासून या सर्कलमध्ये एक हत्ती सत्ता राखण्याचे काम कुंटूरकर घराण्याने केले आहे. राजेश देशमुख कुंटूरकर यांची असलेली जनतेसोबत नाळ आणि जनतेसोबत असलेला संवाद व हेच या निवडणुकीमध्ये फायद्याचे ठरणार असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. कुंटूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध पक्षाकडून विविध इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पोरीने कामाला लागले असून यात भाजप कडून संभाव्य इच्छुक उमेदवार सौ मधुमती राजेश देशमुख कुंटूरकर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून शिवराज पाटील होटाळकर यांच्या पत्नी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून बालाजी चोंडे यांची पत्नी, आणि भाजपकडून दुसरे इच्छुक उमेदवार म्हणून सूर्याजी पाटील चाडकर यांची पत्नी असल्याचे बोलले जात आहे यात राजेश देशमुख कुंटूरकर यांची या सर्कल मध्ये असलेली जनतेसोबत नाळ शेतकऱ्यांसोबत असलेले तत्परता आणि मागील काळामध्ये झालेली काम याचा विचार करता या सर्कलमध्ये कुंटूरकर यांचे पारडे जड मानले जात आहे. राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या संवाद दौऱ्यातून वाढत चाललेला जनाधार हा कायम सत्ता राखण्याचे संकेत असून या सर्कलमध्ये केवळ राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या परिश्रमातून दळणवळणासाठी प्रत्येक गावांना रस्त्यांची कनेक्टिव्हिटी बनलेले आहे. मूलभूत व पायाभूत सुविधा करण्यात राजेश देशमुख कुंटूरकर यांचा मोलाचे योगदान कुंटूर सर्कल साठी असल्याने या भागातील जनता कदापे विसरणार नाही असेही जनतेकडून बोलले जात आहे. म्हणून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राजेश देशमुख यांचे जनाधार कायम राहतील असा जनतेने विश्वास व्यक्त केले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार तथा भाजपा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राजेश देशमुख कुंटूरकर, नायगाव विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब पाटील हंबर्डे, गणपतराव पाटील डोईफोडे, युवा कार्यकर्ते संदीप पाटील शिंदे, गोविंद हंबर्डे, संजय राव पाटील हंबर्डे, उमराव पाटील हंबर्डे, मधुकर हंबर्डे, सूर्यकांत वाघमारे, दत्ता वाघमारे,नागोराव वाघमारे, गौतम गायकवाड सह गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :-

निवडणुकीला सामोरे जात असताना भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि सद्यस्थितीत कारखान्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थोडेफार संयम संयम ठेवावे व आम्हाला सहकार्य करावे. आणि साखर कारखाना येत्या दोन दिवसांमध्ये पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये चालू करू आणि लवकरात लवकर भागातील शेतकऱ्यांचा ऊस प्रयत्न करू कुंटूरकर साखर कारखान्याच्या सभासदांना कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण यासाठी पूर्णपणे काळजी घेऊ मग आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाऊ हे निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची असून या निवडणुकीसाठी सुनियोजन करून जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी आम्ही तयार राहू. — राजेश देशमुख कुंटूरकर

RELATED ARTICLES

Most Popular