HomeBlog*नायगावमध्ये 63 आर भूमी गैरव्यवहाराचा पर्दाफाश 57 वर्षांपूर्वीची N.A. दाबून 2024 मध्ये...

*नायगावमध्ये 63 आर भूमी गैरव्यवहाराचा पर्दाफाश 57 वर्षांपूर्वीची N.A. दाबून 2024 मध्ये नव्याने सनद; नागरिकांमध्ये संताप…

नायगाव प्रतिनिधी ,अशोक वाघमारे.

नांदेड. नायगाव

दिनांक.24/11/2025

भूमी गैरव्यवहाराचा पर्दाफाश 57 वर्षांपूर्वीची N.A. दाबून 2024 मध्ये नव्याने सनद; नागरिकांमध्ये संताप*

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

नायगाव बसस्थानक लगतच्या गट क्र. 418, सर्वे नं. 128 सी या 63 आर जमिनीतील गैरव्यवहाराचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ सोनकांबळे यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीत महसूल अधिकाऱ्यां व भूखंड माफियांच्या संगनमताचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.1967 मध्ये जमीन अकृषिक घोषित झाल्याची नोंद महसूल विभागातून गायब करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. खरेदी–विक्री संघाने जमिनीचे दोन तुकडे करून संशयास्पद लिलाव केला असून बोली लावणाऱ्यांना जमीन न देता तिसऱ्याच व्यक्तीच्या नावावर विक्री झाल्याचा आरोप आहे.कधीही शेती न झालेल्या या पडीत जमिनीवर हळद, सोयाबीन, गहू अशी पिके दाखवून नोंदी तयार केल्याचेही उघड झाले.

सर्वात गंभीर बाब म्हणजे—1967 ची N.A. कायम असताना 4 सप्टेंबर 2024 रोजी नव्याने N.A. सनद देण्यात आली.संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर IPC कलमे व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी सोनकांबळे यांची मागणी आहे.या प्रकरणाच्या चौकशीची प्रतीक्षा नागरिक करीत असून परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES

Most Popular