HomeBlog*नायगाव  भाजपामधील नियुक्त्यांचा  राजकीय कलह ; जिल्हा परिषद निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता*==============

*नायगाव  भाजपामधील नियुक्त्यांचा  राजकीय कलह ; जिल्हा परिषद निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता*==============

नायगाव प्रतिनिधी, अशोक वाघमारे

*नायगाव भाजपामधील नियुक्त्यांचा राजकीय कलह ; जिल्हा परिषद निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता*==============*

नायगाव प्रतिनिधी ,अशोक वाघमारे.

*नायगाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कलपैकी केवळ बरबडा सर्कलमधूनच दोन तालुका अध्यक्षांची नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने स्वतःच गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे. बालाजी मदेवाड आणि श्रीहरी देशमुख या दोघांचेही एकाच सर्कलमधून झालेले नियुक्ती निर्णयामुळे मांजरम व नरसी सर्कलमधील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वारे वाहू लागले आहेत.पक्षबांधणी, संतुलित प्रतिनिधित्व आणि मतसंघातील समन्यायी राजकीय समीकरणे या तिन्हींचा पुरा विचार न करता झालेल्या या नियुक्त्या म्हणजे “एकतर्फी निर्णयाचा नमुना” असल्याच्या चर्चा तळागाळात जोर धरताना दिसतात.

अनेक वर्षांपासून संघटन मजबूत करण्यासाठी दुर्गम सर्कलमध्ये कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पूर्णपणे उपेक्षा झाल्याची भावना अधिक तीव्र होत आहे.सध्या तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची चाहूल लागली असताना, पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी ही भारतीय जनता पक्षासाठी स्वतःच खोदलेला खड्डा ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा रंगू लागली आहे.

मांजरम आणि नरसीमधील कार्यकर्त्यांचा उमाळा ओसंडून वाहत असल्याने, “पक्षश्रेष्ठींनी वेळीच लक्ष घातले नाही तर निवडणुकीत फटका बसणार” हे तर्क–वितर्क आता उघडपणे मांडले जाऊ लागले आहेत.नियुक्त्यांमधील या विसंगतीवरून निर्माण झालेली असंतोषाची ठिणगी मोठ्या आगीचे रूप घेतली, तर आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित पडझड पत्करावी लागू शकते, अशी राजकीय विश्लेषकांचीही कुजबुज सुरू आहे.पक्ष नेतृत्वाने यावर काय भूमिका घेतली जाणार? कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून निर्णय बदलला जाणार का?याकडे तालुक्याचे राजकीय लक्ष लागले आहे.======

चौकट=====

नियुक्ती प्रक्रियेवर कार्यकर्त्यांचा आक्षेप ——————-नियुक्तीची प्रक्रिया गोपनीयपणे व काहीमोजक्या लोकांच्या दबावाखाली पार पडल्याचागंभीर आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.ही नियुक्ती त्वरित मागे घेऊन तळागाळातीलसामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेतनवीन नियुक्ती जाहीर करण्यातयावी, अशी मागणी दिवसेंदिवसअधिक आक्रमक होत चालली आहे.

शिव महाराष्ट्र न्यूज… जनतेचा निर्भीड आवाज..

RELATED ARTICLES

Most Popular