HomeBlogबळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी विध्यार्थीची इंडस्ट्री व्हिजिट अँड कॉलेज टूर......

बळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी विध्यार्थीची इंडस्ट्री व्हिजिट अँड कॉलेज टूर……

नायगाव प्रतिनिधी ,अशोक वाघमारे.

बळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी विध्यार्थीची इंडस्ट्री व्हिजिट अँड कॉलेज टूर……

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

नायगाव शहरातील नामवंत शिक्षण संस्था पैकी एज्युकेशन सोसायटी नायगाव सलग्न बळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्री विजिट अँड कॉलेज टूर करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव केशवराव पाटील चव्हाण यांनी टूर ट्रॅव्हल्स चे उद्घाटन करून गाडीचे नायगाव येथील फार्मसी कॉलेज मधून प्रस्थान करण्यात आली आहे. सदर टूरमध्ये प्रवास तुळजापूर कोल्हापूर गणपतीपुळे रायगड येथे होत असून या टूरमध्ये एकूण ५० विद्यार्थी व १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

फार्मसी कॉलेज मधील लास्ट इयर च्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा समावेश असून सदर टूरमध्ये फार्मसी संबंधित इंडस्ट्री व्हिजिट विविध पर्यटन स्थळ व विविध प्रकारच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून व नैसर्गिक अभ्यास करण्यासाठी हि टूर प्रस्थान करण्यात आली आहे. सदर टूर मध्ये सात ते आठ दिवसाचा प्रवास असून अतिशय शांततेत ही टूर पार पडेल व विद्यार्थ्यांना संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास होईल या दृष्टिकोनातून ही टूर करण्यात आली आहे.

यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, उप प्राचार्य प्राध्यापक, वृंध व कर्मचारी, लायब्ररी लिपिक यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular