HomeBlogहुस्सा येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान पाटील मनुरकर यांच्या नेतृत्वात संवाद...

हुस्सा येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान पाटील मनुरकर यांच्या नेतृत्वात संवाद बैठक… तालुका प्रतिनिधी अशोक वाघमारे ….

हुस्सा येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान पाटील मनुरकर यांच्या नेतृत्वात संवाद बैठक…

नायगाव प्रतिनिधी / अशोक वाघमारे..

नायगाव तालुक्यातील हुस्सा येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान पाटील मनुरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात महत्वकांक्षी बैठक दि.१३ मे रोजी पार पडली आहे.

गोदावरी नदी पात्रात पोचंमपाडच्या बॅक वॉटर मुळे बुडीत क्षेत्र धारकांना विशेष कोल्हापूरच्या धर्तीवर जीआर काढण्यात यांवा व ते तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्या मान्य करण्यासाठी दि.२१ मे रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी नदी काटच्या सर्व शेतकऱ्यांनी व जिल्ह्यातील छोट्या मोट्या नदीच्या बुडीत क्षेत्र धारकांनी मोठ्या संख्येनी सहभागी होऊन शेतकऱ्याचा रास्त मागण्यासाठी शेतकऱ्याचा आवाज बुलंद करून व शेतकऱ्याच गेले अनेक वर्षापासून होत असलेले नुकसान यांचं विशेष पॅकेज यांचं राज्य मंत्रिमंडळ मध्ये तरतूद करून शेतकऱ्यांना अधिकचा अर्थिक लाभ नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावा या पूरग्रस्त भागातील सर्वांना पूरग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावा अशा अग्रही मागणी साठी सरकार दरबारीं आवाज उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधवी असे आवाहन करण्यात आले आहे. " शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मंत्रिमंडळ वेळकाढु करत असेल तर हायकोर्टात दाद मागण्यासाठी आमची तयारी --- भगवान पाटील मनुरकर       मागील ४५वर्षापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पूर परस्थिती मुळे व बॅक वॉटर मुळे शेतातील पीक व शेत जमीन खरडून जाऊन यामुळे शेतकऱ्याचे अर्थिक नुकसान होत आहे. सरकार मात्र विमा कंपनी च्या मार्फत पुटपुंजी मदत देऊन शांत हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि कोल्हापूरच्या धर्तीवर जिआर काढून जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी बुडीत क्षेत्र धारक न्यायाच्या दृष्टीकोनातून आम्ही कारेगाव फाटा येथे तब्बल २१दिवस उपोषणस बसलो होतो आणि त्यातून काही गोष्टी सद्य करता आले आणि जिल्ह्याला यावर्षी मोठ्या प्रमाणात विमा मिळाला आहे. हीच शेतकऱ्याची खरी ताकद आहे.येणाऱ्या २१ मे रोजी मोठं जनआंदोलन व भव्य बाईक रॅली काढून शेतकऱ्याचा आवाज पूर्ण देशभर गेला पाहिजे हा निश्चय बाळगून सामील व्हा हा लढा कुठल्या पक्षा शिवाय असून यात कुठल्याच राजकीय लोक प्रतिनिधीला नसणार आहे. यात केवळ शेतकरी व सामान्य जनता सोबत ठेऊन हा लढा पूर्ण करु.   जिल्ह्यातील बहुतांश भागात पारंपारिक पिकासह बागायती शेती, फुलबाग,भाजीपाले सह विविध पिके घेतली जातात आणि दरवर्षी पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असत मात्र तेलंगनाच्या सरकारच्या जाचक अटीने पोचमपाड धरणाच्या बॅक वॉटर मुळे शेतकऱ्याच्या पिकासह शेत जमीन खरडून जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील राज्य सरकार सुस्त असल्याने शेतकरी राजा हवालदिन होत असून शेतकऱ्याच्या विविध मागण्यासह शेतकरी संघर्ष समिती न्यायासाठी एल्गार पुकारला आहे.  यावेळी भगवान पाटील मनुरकर, तानाजी पाटील, साहेबराव पाटील, सुरेश पाटील, गावातील शेतकरी शरद पाटील हंबर्डे,गणपती डोईफोडे, शिवाजी शिंदे, शंकर हंबर्डे, रावसाहेब हंबर्डे, शाम हंबर्डे, मधुकर हंबर्डे, राम हंबर्डे, दत्तराम हंबर्डे, दादाराव हंबर्डे, वामन हंबर्डे, बालाजी हंबर्डे, बालाजी डोईफोडे, केशव डोईफोडे, किशोर हंबर्डे, नदकिशोर हंबर्डे, जयवंत हंबर्डे, माधव हंबर्डे, उमराव जालणेकर, दाजेराव हंबर्डे,देवराव हंबर्डे, दत्ता तेलंग, गोविंद हंबर्डे यासह गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.चौकट :- आम्ही नुकसाग्रस्त शेतकरी असून आमचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरच्या पाण्यानी नुकसान होत आहे.सरकारनी आम्हाला म्हणावे तेवढी मदत करत नाही म्हणून आमच्यावर अन्याय आहे.म्हणून २१ मे रोजी होण्याऱ्या मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहणार.  -- शरद पाटील हंबर्डे

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे

RELATED ARTICLES

Most Popular