
कोलंबी नगरीचे उत्तमराव गवाले राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित …………………………………….
नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे……………………………………
नायगाव तालुक्यातील मौजे कोंलबी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच उत्तम शंकरराव गवाले यांना दैनिक लोकनेता परिवारांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि.१० मे रोजी परळी वैजनाथ येथील हॉटेल भागवत पॅलेस मध्ये मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून दैनिक लोकनेताच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,अभिनेत्री मेघना झुझम,बाप आयटी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष घुगे,डॉ.मयंक गांधी (संस्थापक GVT),जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहेमान,पोलीस निरीक्षक नाचेन, नगराध्यक्षा पद्यश्रीताई धर्माधिकारी, दैनिक लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर मुंढे यांच्या हस्ते शाल पुष्पहार सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आले. उत्तमराव गवाले हे आपल्या कार्यकाळात सरपंच नात्याने कोलंबी नगरीचा चेहरा मोहरा बदलला असून गाव हितासाठी त्यांनी अनेक कामे पारदर्शकपणे पार पाडली आहे.यासह सामाजिक क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय कार्य केले असल्याने दैनिक लोकनेता परिवाराकडून गवाले यांना परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिवमहाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे




