
सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन सभा संपन्न…….
नांदेड प्रतिनिधी,
नायगाव शहरातील राजश्री शाहू नगर येथे साहित्यरत्न सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यस्मरणार्थ व त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन शाहूनगर मधील आद्य क्रांती पिता लहुजी साळवे सार्वजनिक सभागृह या नियोजित ठिकाणी साजरा करण्यात आला आहे.
प्रारंभी सत्यशोधक डॉक्टर आणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. तर सदर कार्यक्रमात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनियुक्त संचालक श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करून अध्यक्ष समारोप केले आहे. तर प्रा. डॉ.शंकर गड्डमवार ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव,मल्हारराव तोटरे, प्राध्यापक नागनाथ मनुरकर, पत्रकार शाहीर माधव बैलकवाड, यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव बैलके यांनी केले आहे.
यावेळी प्रा.डॉ शंकर गड्डमवार, रवींद्र भालेराव,भिमराव बैलके सी. एस डोईवाडे बी.एन देवकाबळे मल्हारराव तोटरे सभाजी शेळके पिराजी गायकवाड प्राचार्य आरएम सुर्यवंशी दिलीप पाटील, शंकरराव माळगे,डॉ. पि. पि गायकवाड,सोनकांबळे साहेब केंद्रप्रमुख मंगेश हनवटे,विशाल भद्रे, ग्रामविस्तार अधिकारी सुर्यवंशी यादव सूर्यवंशी,माधवराव शेळके बापूराव गायकवाड, एन.सी झुजारे बालाजी काबळे, सुर्यवंशी आनदा, नामेवार रामचंद्र नेहरू प्रल्हाद भालेराव भीमराव बैलकवाडे,सचिन बैलकवाडे देवराव मामा येवले, माधव घटेवाड, डॉ विश्वनाथ भोगे,राजेश्वर गायकवाड, नगरसेवक पांडुरंग सोनकाबळे, भडारे पांडूरग, विठ्ठल भेडेकर,अविनाश वाघमारे हुस्सेकर,परमेश्वर वाघमारे,बबलू काळेवार, आर के वाघमारे,पत्रकार अशोक वाघमारे डॉ गजू जाधव, सुरेश वाघमारे सह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होता.







