
साहेबराव पाटील सुगावे व अमितभाऊ बोंडले मित्र मंडळाकडून श्रीनिवास पाटील चव्हाण यांचा नायगाव येथे भव्य सत्कार
नांदेड,
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आदरणीय श्रीनिवास पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नायगाव येथील खासदार प्रा.रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात घुंगराळा येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व साहेबराव (माली पाटील) सुगावे व अमितभाऊ बोंडले मित्र मंडळाच्या वतीने शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
श्रीनिवास पाटील चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे लोकनेते स्व.खासदार मा.वसंतरावजी चव्हाण साहेब , यांचे बंधू तथा विद्यमान खासदार प्रा.रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांचे काका असून, त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे सहकार क्षेत्राला अनुभवी, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीनिवास पाटील चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच घुंगराळा गावासह परिसरातील विकासकामे, शेतकरी हिताच्या योजना, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी साहेबराव ( माली पाटील) सुगावे, तिरुपती पाटील सुगावे, पंडित पाटील सुगावे, माजी सरपंच प्रतिनिधी, मोहनराव जोगेवार, व्यंकटराव ढगे, उत्तम पाटील ढगे, दिगंबर गंगासागरे, भगवान पाटील ढगे, प्रल्हादराव बोधनकर, शिवाजी पाटील ढगे, चाँदपाशा शेख, सदाशिव पाटील ढगे, देविदास पाटील सुगावे, माधवराव कंचलवाड, कैलास पाटील सुगावे, रघुनाथ पाटील सुगावे, विजय यमलवाड, तसेच अमितभाऊ बोंडले मित्र मंडळाचे सदस्य, घुंगराळा गावातील ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
संपूर्ण सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.उपस्थितांनी श्रीनिवास पाटील चव्हाण यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज अधिक गतिमान होईल आणि ग्रामीण भागाच्या विकासालाही नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला…







