
लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त वृक्ष लागवड व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…
( जनसेवा सप्ताहाला जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर साहेब यांची समाजकार्याची जोड; )
नांदेड प्रतिनिधी,
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित ‘जनसेवा सप्ताह’अंतर्गत बुधवारी (दि. २२ जुलै) नायगाव येथे समाज उपयोगी उपक्रम पार पडले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रारंभी मिलेनियम पब्लिक अँड ज्युनिअर कॉलेज,नायगाव येथे स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यावेळी उपस्थितांनी एक मिनिट मौन पाळून स्वर्गीय दादां यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली.
यावेळी मिलेनियम पब्लिक अँड ज्युनिअर कॉलेज व श्री दत्त जुनिअर कॉलेज नायगाव येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात पर्यावरण संरक्षण,वृक्षसंवर्धन आणि हरित क्रांती महाराष्ट्राच्या संकल्पनेवर नेहमीच भर दिला होता.'वृक्ष माझी सावली,वृक्ष माझी माऊली' हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवराज पाटील होटाळकर यांनी उपस्थित मान्यवरांसह वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शिवराज पाटील होटाळकर बोलताना म्हणाले समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रा.के.व्ही. फाजगे,आर.एम.सूर्यवंशी,होटाळा नगरीचे सरपंच गणेश पाटील पवार,प्रदीप पाटील पवळे,विलास पाटील धुपेकर,रावसाहेब पाटील बेलकर,एकनाथ कल्याण,गुलाबराव पाटील कदम,श्रीपत पाटील शिंदे, वेंकट पाटील शिंदे,दयानंद पाटील मोरे,रेखाताई बनसोडे,माधव पाटील उपासे,आनंदराव पाटील हेडगे,आनंदराव पाटील शिंदे,सटवाजी मामा मोदलवाड,श्रीकांत पाटील शिंदे,संदीप पाटील कदम,सुरज पाटील कदम,लक्ष्मण पाटील उपासे,प्रकाश पाटील बेलकर,बालाजी पा कदम,मारुती पाटील पुयड,मनोहर पाटील हिवराळे,मधुकर पाटील पवार,रंजीत पाटील पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





