
चेअरमन दिलीप देवकांबळे यांचा नायगाव येथे सत्कार….
नांदेड प्रतिनिधी
नांदेड जिल्हा सहकारी शिक्षक पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन दिलीप देवकांबळे यांचा नायगाव येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली तर शिक्षक, समाज बांधव यांच्या उपस्थितीत भव्य असा सत्कार करून त्यांना भरभरून शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली नांदेड जिल्हा सहकारी शिक्षक पतसंस्था या संस्थेत 20 ते 25 कोटी रुपयाची गुंतवणूक असून गेल्या अनेक वर्षापासून पारदर्शकपणे चालत असलेली या पतसंस्थेच्या चेअरमन पदी मुखेड येथील पीएम श्री जिल्हा परिषद कन्या शाळेतील शिक्षक दिलीप देवकांबळे यांची बिनविरोधपणे निवड झाल्याने नायगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली तर साहित्यिक वीरभद्र मिरेवाड,केंद्रप्रमुख मंगेश हनवटे,मुख्याध्यापक भीमराव बैलके, सुरेश बाराळे, पी एन भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चेअरमन दिलीप देवकांबळे यांचा भव्य असा सत्कार करून भरभरून शुभेच्छा देत अभिनंदन केले. याप्रसंगी अनेकांनी आपले मत व्यक्त केले असून प्रस्तावना भिमराव बैलके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रमोद केसराळीकर आभार बाबुराव गायकवाड यांनी मानले यावेळी सेवानिवृत्त अभियंता शंकरराव माळगे डॉक्टर भीष्म झुंजारे, सेवानिवृत्त अभियंता किनाळकर,मल्हारराव तोटरे, चंद्रकांत डोईवाड, शिक्षक शिराढोणकर,जाधव,वानोळे पत्रकार अशोक वाघमारे हुसेकर, अविनाश वाघमारे यासह अनेकांची उपस्थिती होती.




