HomeBlogरावे (RAWE & AIA ) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायगाव येथे...

रावे (RAWE & AIA ) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायगाव येथे शैक्षणिक भेट व पोकरा योजनांविषयी मार्गदर्शन…. नांदेड प्र. अशोक वाघमारे.

रावे (RAWE & AIA ) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायगाव येथे शैक्षणिक भेट व पोकरा योजनांविषयी मार्गदर्शन

नांदेड प्रतीनीधी,

रावे (RAWE & AIA )कार्यक्रमांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, नायगाव येथील सातव्या सत्रातील कृषिदूत व कृषिकन्या विद्यार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायगाव येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश कृषी विभागाचे कार्य, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना आणि हवामान बदलास अनुकूल शेतीविषयक उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती घेणे हा होता.
या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री. दीपेश देवरे तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी पोकरा (POCRA – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच Climate Resilient Agriculture (हवामान बदलास अनुकूल शेती) या संकल्पनेचे महत्त्व, त्यामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

पोकरा अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना (ठिबक व तुषार सिंचन), शेततळे व जलसंधारण योजना, फळबाग लागवड योजना, मृदा आरोग्य व सेंद्रिय शेती प्रोत्साहन, हवामान बदलास अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक विविधीकरण तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कार्यालयीन कामकाज, विविध योजनांची अंमलबजावणी, लाभार्थी निवड प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची प्रत्यक्ष माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध शंकांचे निरसन केले व भेटीचा अहवाल सादर करण्यात आला.ही भेट ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE आणि AIA)अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण, संस्थेचे संचालक प्रा. आर. सी. लव्हेकर, प्राचार्य डॉ. आर. जी. नादरे यांच्या
मार्गदर्शनाखाली, तसेच उपप्राचार्य प्रा. नागेश घुबे, RAWE समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, RAWE कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. एस. ए. शेंडगे‌‌ व मुलींचे कार्यक्रमाधिकारी डॉ नीता देवकते यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला

RELATED ARTICLES

Most Popular