HomeBlogमिलेनियम पब्लिक स्कूलची आषाढी दिंडी उत्साहात; चिमुकल्या वारकऱ्यांनी जपली भक्ती परंपरा... नांदेड...

मिलेनियम पब्लिक स्कूलची आषाढी दिंडी उत्साहात; चिमुकल्या वारकऱ्यांनी जपली भक्ती परंपरा… नांदेड प्र. अशोक वाघमारे.

मिलेनियम पब्लिक स्कूलची आषाढी दिंडी उत्साहात; चिमुकल्या वारकऱ्यांनी जपली भक्ती परंपरा

नांदेड प्रतिनिधी,

दि. २५ जुलै श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,नायगाव येथे आज (दि.२५ जुलै) आषाढी एकादशी निमित्त पारंपारिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यां यांची भव्य आषाढी दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली.या दिंडी सोहळ्यास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी या आषाढी दिंडी सोहळ्यातील पालखीचे मनोभावे दर्शन करून आपली उपस्थिती दर्शवली.

या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत टाळ-मृदुंगाच्या गजरात,विठ्ठल नामाचा अखंड जयघोष करत भक्तिमय वातावरण निर्माण केले.दिंडीची सुरुवात मिलेनियम पब्लिक स्कूल येथून होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.अण्णाभाऊ साठे चौक मार्गे श्री शिवराज पाटील होटाळकर यांच्या निवासस्थानी झाली.
यावेळी पालखी सोहळ्याचे पूजन व आरती श्री दत्तात्रेय पाटील होटाळकर,सौ.अर्चनाताई दत्तात्रेय पाटील होटाळकर आणि सौ. दिपालीताई शिवराज पाटील होटाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.उपस्थितांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात पालखीचे दर्शन घेतले.
या उपक्रमास श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय प्रमुख प्राचार्य श्री के.व्ही.फाजगे सर,प्राचार्य आर.एम.सूर्यवंशी सर,प्राचार्य कोत्तेवार सर,मुख्याध्यापक एकनाथ कल्याण सर,प्राचार्य वडजे सर,उपप्राचार्य जोशी सर,श्री आनंद पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
यावेळी गुरुराज दत्तात्रेय पाटील पवार,प्रदीप पाटील पवळे,आनंदराव पाटील शिंदे,श्रीकांत पाटील शिंदे, प्रकाश पाटील बेलकर,आशिष दादा गोरठेकर, श्रीराम पाटील पवार यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षकवृंद आणि नायगाव परिसरातील वारकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular