
लोकनेते स्व.माजी आ.बळवंतराव पाटील चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ खा.रवींद्र चव्हाण व सहकुटुंबियानी वाहिली पुष्पांजली…..
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित अभिवादन सभा संपन्न…
नांदेड प्रतिनिधी,
नायगाव सह जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर आपल्या कार्यांचा ठसा उमटविणारे नायगाव पंचक्रोशीचे भाग्यविधाते लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बळवंतरावजी पाटील चव्हाण यांच्या 19 व्या पुण्यस्मरणार्थ हनुमान मंदिर परिसरातील स्मृतीस्थळ व जनता हायस्कूल येथील असलेले ज्ञानतीर्थ येथे हजारोंच्याहत्यांनी पुष्पांजली अर्पण केले आहे. व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावून भावपूर्ण स्मरणभावनेच्या वातावरणात आदरांजली.
सुरुवातीला स्वर्गीय बळवंतराव जी चव्हाण यांच्या स्मृती स्थळाचे विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण वातावरणात पुष्पहार अर्पण करून त्यांच्या राजकीय व सामाजिक शैक्षणिक कार्यांचा कर्तेज्ञतापूर्वक विविध मान्यवरांनी विचार मांडले आहे. स्वर्गीय बळवंतराव जी चव्हाण यांचे विचार हे दूरदृष्टीचे होते नायगाव सारख्या शहरांचा विकासाच्या दृष्टिकोनातून व मजबूत पायाभूत सुविधा सह शहरातील व्यापारी व व्यावसायिक उद्योजकांना प्रोत्साहन देऊन नायगाव शहराचा भक्कमपणे विकास झाला पाहिजे या विचारांचे ते होते. एकूणच स्वर्गीय आ.बळवंतरावजी चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख करून विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले आहे.
यावेळी ज्येष्ठ नातू डॉक्टर अमरजीत पाटील चव्हाण, सौ रूपालीताई पाटील चव्हाण, खासदार रवींद्र पाटील चव्हाण व सोनियाताई रवींद्र पाटील चव्हाण, स्वर्गीय बळवंतराव जी चव्हाण यांचे जेष्ठ कन्या लक्ष्मीबाई शिंदे मांजरमकर यांच्या शुभहस्ते स्मृतीस्थळाचे पूजन करण्यात आले त्यानंतर पंकज पाटील चव्हाण, सायली ताई चव्हाण, श्रीकांत पाटील, श्वेता ताई चव्हाण, अमित पाटील, शितलताई पाटील चव्हाण, विराज पाटील, ईशान पाटील,व राजवंश पाटील, यांच्या हस्ते विद्युत पूजा सोहळा संपन्न.
यावेळी जेष्ठ केशवराव पाटील चव्हाण,हनुमंतराव पाटील चव्हाण, सुधाकर पाटील चव्हाण, आनंदराव पाटील चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण, वेंकट पाटील चव्हाण,विजय पाटील चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण, धनंजय पाटील चव्हाण,डॉक्टर विश्वास पाटील चव्हाण, यांचा सह समस्त चव्हाण परिवार उपस्थित होते..
अभिवादन सोहळ्यास माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, व विविध क्षेत्रातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माझी आजी नगराध्यक्ष नगरसेवक विविध गावातून आलेले सरपंच कार्यकर्ते पदाधिकारी व चव्हाण कुटुंबीयांवर प्रेम करणारे सर्व चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






