HomeBlogश्याम गायकवाड यांना ‘समाज परिवर्तन पुरस्कार’ जाहीर.... नायगाव, गोविंद नरसीकर

श्याम गायकवाड यांना ‘समाज परिवर्तन पुरस्कार’ जाहीर…. नायगाव, गोविंद नरसीकर

श्याम गायकवाड यांना ‘समाज परिवर्तन पुरस्कार’ जाहीर

सामाजिक बांधिलकी, पत्रकारिता व कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव

नायगाव बाजार – गोविंद नरसीकर

सामाजिक बांधिलकी, पत्रकारिता तसेच कला व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे नरसी येथील लोकप्रिय गायक व पत्रकार श्याम कोंडीबा गायकवाड यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज परिवर्तन पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.

मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवा संस्था व मायडी बहुउद्देशीय सेवा संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समता गौरव पुरस्कार २०२६’ अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत सामाजिक जाणीव जपत सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.

श्याम गायकवाड यांच्या सामाजिक, पत्रकारिता तसेच कला-सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह मित्रपरिवार व हितचिंतकांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांना आपल्या कार्यातून पुढे नेणाऱ्या गायकवाड यांच्या योगदानाचा हा सन्मान असून, त्यांच्या कार्याला मिळालेली ही कौतुकाची पावती मानली जात आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्याम गायकवाड यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक, पत्रकारिता व सांस्कृतिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular