HomeBlogअवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर नायगाव पोलिसांची कारवाई; ६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.......

अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर नायगाव पोलिसांची कारवाई; ६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त…. नांदेड, अशोक वाघमारे

नांदेड / प्रतिनिधी :

तालुक्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नायगाव पोलिसांनी अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडच्या ४७७ बाटल्या विदेशी दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार, असा एकूण ६ लाख १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री गस्तीवर असताना नायगाव पोलिसांना नायगाव परिसरात अवैध विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वडजे रुग्णालयाजवळ सापळा रचून MH-12 NJ-2346क्रमांकाची कार अडवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. वाहनातून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या ४७७ बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये MC डोव्हल्स क्लासिक गोल्ड व्हिस्की, फॅलुकियन ब्लू व्हिस्की, मास्टर डिलाईट व्हिस्की, रॉयल स्टॉक आदी ब्रँडचा समावेश आहे. दारूची किंमत १ लाख १ हजार ७९० रुपये, तर वाहनाची अंदाजित किंमत ५ लाख रुपये असून एकूण ६ लाख १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विशाल बहादुरमलभंडारी (वय ४०), संजय शंकर बाणेवाड गणेश गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव रा.रामसुगाव ता. नायगाव यांच्याविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 192/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ), ६५(ड) व 65 ( ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील भोवकर व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अमोल भगत, पोलिस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, पोलिस उपनिरीक्षक बालाजी आंबुलगेकर तसेच पोलिस अमलदार सदाशिव माधव पवार, दीपक शेरीकर, विनोद भंडारे व अभिजीत पाटील यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES

Most Popular