HomeBlogआरक्षण उपवर्गीकरण समर्थन महामोर्चाच्या नियोजन बैठकीचे भव्य आयोजन .... नांदेड, अशोक वाघमारे

आरक्षण उपवर्गीकरण समर्थन महामोर्चाच्या नियोजन बैठकीचे भव्य आयोजन …. नांदेड, अशोक वाघमारे

आरक्षण उपवर्गीकरण समर्थन महामोर्चाच्या नियोजन बैठकीचे भव्य आयोजन.

नांदेड, अशोक वाघमारे

अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरण हे मातंग आणि तत्सम वंचित जातींच्या उद्धाराचे प्रवेशद्वार आहे. मातंग आणि वंचित जातींच्या तीन दशकांच्या अथक संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने दि.1/8/2024 रोजी ऐतिहासिक निकालाद्वारे अनु.जातीच्या उपवर्गीकरणावर शिक्कामोर्तब केले. त्यास अनुसरुन ज्या ज्या राज्यात अनु.जाती उपवर्गीकरणाची मागणी होती त्या त्या सर्व उत्तरेतील आणि दक्षिणेतील राज्यांत एक वर्षा पूर्वीच उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील सर्व वंचित जातींना न्याय मिळणे सुरू झाले आहे.
परंतु पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्यापही आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेले नाही. महार समाजाचा प्रचंड दबाव हा त्या मागचे एक प्रमुख कारण आहे. महार समाज एकवटून आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सर्व जिल्ह्यातून मोर्चे काढत आहे. त्यामुळे सरकारची आरक्षण उपवर्गीकरणाची पूर्ण तयारी झालेली असताना सरकार ते लांबणीवर टाकत आहे. विरोधकांचा दबाव वाढत गेला आणि समर्थनाची चळवळ कमी पडली तर हाता तोंडाशी आलेले उपवर्गीकरण लांब जाऊ शकते किंवा रद्द होऊ शकते. तेव्हा मातंग आणि वंचित जातींसाठी करा किंवा मरा ची परिस्थिती असून मातंग समाजही संबंध महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरणासाठी पेटून उठला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून आणि तालुक्यातून उपवर्गीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे होत आहेत. लातूरमध्ये तर आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात दिड लाखाचा मोर्चा झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पक्ष, संघटना,गट तट इ. सर्व बाजूला सारून उपवर्गीकरणासाठी समाज एकवटला आहे, त्यामुळे दखलपात्र मोर्चे महाराष्ट्रात होत असून समाजाने उपवर्गीकरणाची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे.
नांदेड हा महाराष्ट्रातील मातंग समाजाचा क्रांतीचा जिल्हा आहे. त्यामुळे नांदेड मधून आरक्षण उपवर्गीकरणाच्या महाक्रांतीचा संदेश सरकारला आणि संबंध महाराष्ट्राला देण्याच्या दृष्टीने नांदेड येथे मातंग समाजाचे सर्व पक्षातील नेते, आजी माजी लोकप्रतिनीधी, सर्व सामाजिक नेते यांच्या उपस्थितीत आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थळ: लोकमान्य मंगल कार्यालय, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, नवा मोंढा नांदेड
दिनांक : 15/08/2026
वार : शनिवार
वेळ : दुपारी 1.00 वा.

 तरी उपरोक्त महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि नांदेड शहराच्या प्रत्येक वार्डातील सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी बांधव आणि समाज बांधवांनी अगदी आग्रहाने उपस्थित रहावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

सकल मातंग समाज, नांदेड

RELATED ARTICLES

Most Popular