HomeBlogउद्योजक बालाजी बच्चेवार यांचा दै. मराठीबाणा समूहांकडून होणार गौरव….नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

उद्योजक बालाजी बच्चेवार यांचा दै. मराठीबाणा समूहांकडून होणार गौरव….नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

उद्योजक बालाजी बच्चेवार यांचा दै. मराठीबाणा समूहांकडून होणार गौरव….

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ५ जुलै रोजी विविध क्षेत्रातील मंडळी सन्मानित होणार…..

नांदेड प्रतिनिधि,

 नायगाव तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबर उद्योग क्षेत्रात भरीव दमदार कामगिरी बजावणारे आणि जिल्ह्यातील आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले नायगाव नगरीचे भूमिपुत्र भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य तथा उद्योजक बालाजी बच्चेवार यांची दै. मराठीबाणा उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा सन्मान सोहळा दि.५ जुलै रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे संपन्न होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय व दमदार कामगिरीबद्दल व सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबर उद्योग क्षेत्रात गगन भरारी घेत जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दै.मराठीबाणा समूहाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याबरोबरच बालाजी बच्चेवार हे आक्रमक व धुरंदर नेते म्हणून स्वतः च्या कर्तृत्वातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहेत. बालाजी बच्चेवार हे जेवढे राजकारणी आहेत तेवढेच प्रसिद्ध उद्योजक म्हणून देखील सबंध जिल्ह्यामध्ये ओळख आहे. जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये ठसा उमटविल्याबद्दल आणखी एका मानाचा तुरा ठरणार आहेत.
बालाजी बच्चेवार हे उद्योग क्षेत्रातील सातत्य यातून यशाची परंपरा कायम ठेवून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविल्याने दै.मराठीबाणा समूहाकडून उद्योजक बालाजी बच्चेवार यांचा गौरव होणार असल्याने. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा व कौतुकांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular