दिवसाढवळ्या गुंडगिरी — पोलिसांत गुन्हा दाखल
नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे
सामाजिक कार्यकर्तीला थेट जिवे मारण्याची धमकी! “तक्रार मागे घे नाहीतर संपवतो” अशा उघड शब्दांत धमकी देत गुंडगिरीचा थरकाप उडवणारा प्रकार नायगाव शहरात उघडकीस आला आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सोनाली उर्फ मंगल प्रकाश हंबर्डे (वय ३७, रा. विठ्ठलनगर, नायगाव) यांच्यावर ही धक्कादायक वेळ आली असून, या प्रकरणी नायगाव पोलिसांनी माधव दत्ता गिरगावे (रा. नायगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोनाली हंबर्डे या समाजहितासाठी सतत झटणाऱ्या कार्यकर्त्या असून, त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी नायगाव येथील बाँड विक्री करणाऱ्या दोन परवानाधारकांविरुद्ध अनियमिततेची तक्रार जिल्हा निबंधक (वर्ग–१) नांदेड तसेच सहायक दुय्यम निबंधक, नायगाव यांच्याकडे दाखल केली होती.या तक्रारीचा राग मनात ठेवून आरोपी गिरगावे याने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास ९ वाजता हेडगेवार चौकात हंबर्डे यांच्या जवळ येऊन संतापाने वाद घातला.
“तु बाँड विक्रेते यांच्या विरोधात तक्रार का दिलीस? तुझ्यामुळे माझा धंदा बंद झाला!” असे म्हणत त्याने अश्लील शिवीगाळ केली आणि पुढे “तु रांड आहेस, तुला जीवनातून उठवतो. तु तक्रार मागे घेतली नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही!” अशी उघड धमकी दिली.
या वेळी उपस्थित असलेले दोघांनी यांनी दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोनाली हंबर्डे यांनी तात्काळ नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दिली.
नायगाव पोलिसांनी भा.दं.वि. कलम ५०४, ५०६, ५१० अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाचे काम पोलीस शिपाई साईनाथ नागोराव सांगवीकर (क्रमांक १३४०१०००३६२) यांच्याकडे सोपविले आहे.
चौकट:-
या घटनेनंतर नायगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून, “सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी!” अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. आरोपी हे मागील अनेक वर्षापासून चोरीचे मोबाईल सरासपणे विक्री करत आहें. आणि नायगाव परिसरातील काही महिलांची सुद्धा छेडछाड केले असल्याची माहिती मिळाली आहे. एकूणच आरोपी माधव दत्ता गिरगावे यांच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद असून गिरगावे हा मोकाट पणे नायगाव शहरात गुंडगिरीचा प्रकार वारंवार घडवीत आहें आरोपी माधव गिरगावे यांनी अशा गुन्ह्यांना न जुमानता वारंवार विचित्र आणि चोरीचे प्रकार करत राहतात आणि हा गुंड वारंवार चर्चेमध्ये राहत असून देखील पोलीस प्रशासनाने अजून त्या गुंडांना ताब्यात घेत नाही. बाँड विक्रेत्यांच्या अनियमिततेवर पांघरूण घालण्यासाठी अशा गुंड प्रवृत्तीचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.अशा प्रकारची तक्रार तहसीलदार नायगाव यांच्या कडे देऊन सखोल चौकशी ची मागणी करणार असे सोनाली हंबर्डे यांनी सांगितले आहे .सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांवर अशी दहशत माजविणे म्हणजे लोकशाहीच्या मुळावरच घाव आहे, असा प्रखर संताप नायगावात उसळला आहे.







