नायगाव प्रतिनिधी, अशोक वाघमारे.

डाॅ. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानदिना निमित्ताने 39 रक्तदात्यांनी रक्त देवून केले अभिवादन………..
नायगाव प्रतिनिधी, अशोक वाघमारे.
नायगांव शहरात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही भारतरत्न प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सकाळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात या वेळी नायगाव नगर पंचायतीचे उपअध्यक्ष विजय पा.चव्हान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी पंढरी भालेराव शरद भालेराव भालेराव.विजय भालेराव.दयानंद भालेराव. विठ्ठल बेळगे पांडू चव्हाण. सुनील सोनकांबळे,यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी 39रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले.
सायंकाळी सात वाजता कॅन्डल मोर्चा शहरातीलमुख्य मार्गाने काढण्यात आले व सायंकाळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक तथा कवी प्रा.गौतम पवार भुकमारीकर यांचे चळवळीचे गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. वरील कार्यक्रम सार्वजनिक भिमजंयती मंडळ यांनी सुरेख नियोजन करण्यात आले होते
शिव महाराष्ट्र न्यूज. जनतेचा निर्भीड आवाज ….







