HomeBlogनायगाव येथील बँक ऑफ इंडिया चा शंकर म्हेत्रे यांनी पदभार स्वीकारले …नांदेड...

नायगाव येथील बँक ऑफ इंडिया चा शंकर म्हेत्रे यांनी पदभार स्वीकारले …नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

  • नायगाव येथील बँक ऑफ इंडिया चा शंकर म्हेत्रे यांनी पदभार स्वीकारले …
  • पत्रकार बांधवाकडून शाल-हार घालून मॅनेजर शंकर महत्रे यांचा सत्कार

नांदेड प्रतिनिधी,

नायगाव, दि. १४ जुलै : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी मात करत देगलूर तालुक्यातील तमलूर येथील सुपुत्र शंकर म्हेत्रे यांनी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नायगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेत त्यांनी नव्याने शाखा व्यवस्थापक (बँक मॅनेजर) म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा नायगावातील ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते शाल व हार घालून बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथे सत्कार करण्यात आला.

दि. १४ जुलै रोजी बँक ऑफ इंडिया, नायगाव शाखेत आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार पंडित वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार गोविंद नरसीकर, पत्रकार तानाजी शेळगावकर, पत्रकार मधुकर जवळे, पत्रकार अशोक वाघमारे, प्रकाश कामळजकर, अविनाश वाघमारे आणि माणिक पाटील शेळगावकर यांनी शंकर म्हेत्रे यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांनी शंकर म्हेत्रे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा विशेष उल्लेख केला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत त्यांनी खडतर मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर बँकिंग क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ग्रामीण भागातील युवकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी असून, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना शंकर म्हेत्रे यांनी व्यक्त केलेल्या सन्मानाबद्दल उपस्थितांचे आभार मानले. ग्राहकाभिमुख, पारदर्शक आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नव्याने पदभार स्वीकारलेल्या शंकर म्हेत्रे यांच्या नियुक्तीमुळे नायगाव परिसरातील ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शाखेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular